ETV Bharat / business

तुमच्या हातामधील नोटांनीही पसरू शकतो कोरोना, एसबीआयने सूचविला 'हा' पर्याय - कोरोना

कोरोना टाळण्यासाठी अनेकजण घराबाहेर कमी पडत आहेत. तर डिजीटल व्यवहारांचा वापर करण्यावरही भर देण्यात आहे. तरीही भारतात संपूर्णपणे डिजीटल व्यवहार करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत नोटांमुळे कोरोना होण्याची भीती असल्याचे एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे.

चलनी नोटा
चलनी नोटा
author img

By

Published : Mar 21, 2020, 5:20 PM IST

नवी दिल्ली -कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेकजण विविध उपाय करतात. मात्र, चलनातील २०० व ५०० रुपये अशा नोटांमुळेही कोरोना होवू शकतो, अशी भीती आहे. प्लास्टिकच्या नोटांचा वापर करण्यावर सरकारने वेळीच विचार करावा, असे एसबीआयच्या संशोधकांनी अहवालात सूचविले आहे.

कोरोना टाळण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. तर आर्थिक व्यवहारासाठी डिजीटल व्यवहारांचा वापर करण्यावरही भर देण्यात आहे. तरीही भारतात संपूर्णपणे डिजीटल व्यवहार करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत नोटांमुळे कोरोना होण्याची भीती असल्याचे एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडाप्रमाणे प्लास्टिकच्या नोटांचा वापर करण्यावर सरकारने विचार करावा, असे एसबीआयच्या संशोधकांनी अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा-रेल्वेचे तिकिट रद्द झाले तरी चिंता नको...४५ दिवसापर्यंत मागू शकता रिफंड

जरी काळजी घेतली तरी नोटांचा वापर आपण पूर्णपणे टाळू शकत नाही, असे १७ मार्चच्या इकोरॅपच्या अहवालात म्हटले आहे. कोरोनाचा प्रसार होणे नोटांमधून सहजशक्य होवू शकते. त्यामुळे तातडीने पावले उचलण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

  • अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) नोटांवर सूक्ष्मजीवाणू असल्याने रोग आणि संसर्ग होत असल्याकडे लक्ष वेधले होते.
  • नोटांमुळे मुत्रसंसर्ग आणि श्वसन, त्वचा असे संसर्ग होण्याचा तज्ज्ञ इशारा देतात.
  • चलनी नोटा हा संसर्गाचे कारण असल्याने आरोग्याला धोका असल्याचे विविध पुराव्यांमधून समोर आले आहे.
  • चलनी नोटांपैकी ५६ टक्के नोटांमध्ये रोगाला कारण ठरणारे जीवाणू असल्याचे धक्कादायक सत्य २०१६ मध्ये समोर आले होते.

हेही वाचा-कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करा, सरकारच्या उद्योगांना सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.