मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने बंधन बँकेला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमांचे अनुपालन करताना त्रुटी राहिल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे.
बंधन बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर आरबीआयने दंडात्मक कारवाई केली आहे. यापूर्वी आरबीआयने बंधन बँकेला नवीन शाखा काढण्यास मनाई केली होती. दरम्यान, बंधन बँकेला दुसऱ्या तिमाहीत ९७२ कोटींचा नफा झाला आहे. यामध्ये गृह कर्ज आणि परवडणाऱ्या दरातील घरांच्या कर्जाचा समावेश आहे.
हेही वाचा-आरबीआयचा राज्यातील 'या' दोन सहकारी बँकांना दणका; सव्वा कोटींचा दंड
आरबीआयने पुणे जनता सहकारी बँकेला २५ लाखांचाही दंड ठोठावला आहे. द जळगाव पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेलाही १ कोटींचा दंड ठोठावला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ही बँकांची बँक म्हणून कार्य करते. बँकिंग कायद्यानुसार आरबीआयला बँकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आहेत.