ETV Bharat / business

तणनाशकातून कर्करोगाला निमंत्रण ; ग्लायफॉसेटवर ऑस्ट्रियाने घातली बंदी - Roundup

ऑस्ट्रियामध्ये सामाजिक लोकशाही पक्षाने ग्लायफॉसेटवर बंदीचे विधेयक सादर केले. त्याच्या वापराने कर्करोग होत असल्याचा संशय आहे. कर्करोगाबाबत पूर्व सावधगिरी म्हणून तणनाशकावर बंदी घालण्यात आली आहे.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Jul 3, 2019, 2:28 PM IST

व्हिएन्ना - शेतीत वापरले जाणारे ग्लायफॉसेट तणनाशक हे कर्करोगाला निमंत्रण ठरत असल्याचा आरोप आहे. याची गंभीर दखल घेत ऑस्ट्रियातील संसदेत ग्लायफॉसेटवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रिया हा वादग्रस्त तणनाशकावर बंदी घातलेला युरोपीय युनियनमधील पहिला देश ठरला आहे.

ऑस्ट्रियामध्ये सामाजिक लोकशाही पक्षाने ग्लायफॉसेटवरील बंदीचे विधेयक सादर केले. त्याच्या वापराने कर्करोग होत असल्याचा संशय आहे. कर्करोगाबाबत पूर्व सावधगिरी म्हणून तणनाशकावर बंदी घालण्यात आली आहे.

अमेरिकेच्या मॉनसँटो कंपनीकडून ग्लायफॉसेट उत्पादनाचे जगभरात विपणन (मार्केटिंग) केले जाते. हे उत्पादन जर्मनीच्या बायर कंपनीने अमेरिकेच्या राऊंडअप कंपनीकडून 2018 मध्ये विकत घेतले आहे. यानंतर बायर कंपनीवर टीका झाली होती. ग्लायफॉसेटच्या परवान्याचे नुतनीकरण करताना पारदर्शीपणा ठेवण्यात येईल, असे कंपनीने आश्वासन दिले होते. असे असले तरी बायरच्या उत्पादनामध्ये ग्लायफॉसेटचे पूर्वीप्रमाणे महत्त्वाचे स्थान असेल, असे कंपनीने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने ग्लायफॉसेट हे कर्करोगाला अनुकूल असण्याची शक्यता व्यक्त केली होती. तरीही युरोपियन युनियनने डिसेंबर 2017 मध्ये तणनाशकांच्या परवान्यांचे पाच वर्षांसाठी नुतनीकरण केले आहे.

राऊंडअप कंपनी गोत्यात-
ग्लायफॉसेटचे उत्पादन करणाऱ्या राऊंडअप कंपनीवर कॅलिफॉर्नियामध्ये तीन मोठे दावे करण्यात आले आहेत. सध्या अमेरिकेत राउंडअपवर 13 हजारांहून अधिक दावे करण्यात आले आहेत. युरोपियन युनियनमधील फ्रान्सने 2017 मध्ये तीन वर्षात ग्लायफॉसेटवर बंदी घालण्यात येईल, अशी आशा व्यक्त केली होती. मात्र राष्ट्राध्यक्ष एम्मॅन्यूएल मॅक्रॉन सत्तेत असल्यापासून हे फ्रान्सला 100 टक्के शक्य झालेले नाही.

युरोपियन युनियनने मंजुरी देवूनही तणनाशकावर बंदी घातल्याने ऑस्ट्रियाला इतर देशांकडून टीकेला सामारे जावे लागण्याची शक्यता आहे. देशात केरळ आणि पंजाबमध्ये ग्लायफॉसेटवर बंदी घालण्यात आली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.