तिरुपूर - इंग्लंड हा देश युरोपियन युनियनमधून बाहेर पडणार (ब्रेक्झिट) आहे. यामुळे पाश्चिमात्य राष्ट्रातच अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोकरी शर्ट, स्वेटरसाठी प्रसिद्ध असलेल्या देशातील तिरुपूर शहरातही व्यापाराबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. युरोपिन युनियनबरोबर भारताने मुक्त व्यापार करार करू नये, तिरपूर निर्यातदार संघटनेची मागणी केली आहे.
तिरुपूर हे इंग्लंडपासून ८ हजार किलोमीटर अंतरावर तामिळनाडूमध्ये आहे. मात्र बेक्झिटनंतर निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी येथील उद्योग सरसावले आहेत. तिरुपूर हे लोकरीपासून तयार करण्यात येणारे स्वेटर, लोकरी टीशर्टसाठी प्रसिद्ध आहे.
तिरुपूर येथील नीटवेअर हे प्रगत देशातही लोकप्रिय आहेत. त्याची निर्यात युरोपसह इंग्लंडमध्ये निर्यात होते. मात्र तिरपूरमधू युरोप युनियनमध्ये होणारी निर्यात थंडावली आहे. तिरुपूर निर्यात संघटनेने केंद्र सरकारला मुक्त व्यापार बंद करण्याची विनंती केली आहे. ईटीव्हीशी बोलताना संघटनेचे अध्यक्ष राजा एम. शानमुघम म्हणाले, की इंग्लंड हे युरोपियन युनियनमधून बाहेर पडत असल्याने काही बदल होऊ शकतात. काही इंग्लंडमधील खरेदीदारांनी निश्चित केलेल्या वेळेपूर्वी निर्यात करण्याची विनंती केली आहे.
बेक्झिटची २०१६ पासून चर्चा सुरू आहे. तेव्हापासून संघटना मुक्त व्यापार बंद करण्याची मागणी करत आहे. भारत आणि युरोपीयन युनियनमध्ये २००७ मध्ये मुक्त व्यापारासाठी द्विपक्षीय करार करण्यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच गुंतवणुकीचा (बीटीआयए) करारदेखील करण्याची चर्चा करण्यात आली होती. मात्र ब्रेक्झिटचा विषय चर्चेत आल्यानंतर हा करार स्थगित करण्यात आला.