ETV Bharat / business

आत्मनिर्भर भारत: अ‌ॅमेझॉन देशात पहिल्यांदाच डिव्हाईसचे करणार उत्पादन

देशात पहिल्यांदाच अ‌ॅमेझॉन डिव्हाईसचे उत्पादन करणार आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडियाच्या मोहिसाठी कंपनी वचनबद्धता दाखवित असल्याचे अ‌ॅमेझॉनने म्हटले आहे.

अ‌ॅमेझॉन फायर टीव्ही
अ‌ॅमेझॉन फायर टीव्ही
author img

By

Published : Feb 16, 2021, 6:31 PM IST

नवी दिल्ली - अ‌ॅमेझॉन देशात फायर टीव्ही स्टिक्ससह विविध डिव्हाईसचे उत्पादन चेन्नईमध्ये घेणार आहे. त्यासाठी कंपनीने फॉक्सकॉन्नची मालकी असलेल्या क्लाउट नेटवर्क टेक्नॉलॉजीबरोबर भागीदारी केली आहे.

देशात पहिल्यांदाच अ‌ॅमेझॉन डिव्हाईसचे उत्पादन करणार आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडियाच्या मोहिसाठी कंपनी वचनबद्धता दाखवित असल्याचे अ‌ॅमेझॉनने म्हटले आहे. उत्पादन प्रकल्पामधून दरवर्षी शेकडो फायर टीव्ही स्टिक डिव्हाईसचे उत्पादन घेता येणार आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांच्या गरजेची पूर्तता पूर्ण होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा- पेट्रोल-डिझेलच्या महगाईचा 'भडका' थांबेना...सलग आठव्या दिवशी दरवाढ

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले की, भारत हे गुंतवणुकीसाठी आकर्षण केंद्र झाले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी उद्योगांसाठी जागतिक पुरवठा साखळीचे मुख्य ठिकाण झाले आहे. उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेला (पीएलआय) जगभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अ‌ॅमेझॉन चेन्नईमध्ये उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे. या निर्णयाचे स्वागत करत असल्याचेही केंद्रीय मंत्री प्रसाद यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-सोन्याच्या दरात किंचित घसरण; चांदी प्रति किलो ९५ रुपयांनी महाग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.