सॅनफ्रान्सिस्को - कोरोना प्रसार वाढत असल्याने अनेक अमेरिकन लोक ऑनलाईन खरेदीवर अवलंबून राहत आहेत. त्यामुळे वाढलेल्या मागणीची पूर्तता करण्यासाठी अॅमेझॉन प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून अॅमेझॉन ही ऑनलाईन कंपनी १ लाख कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ आणि अर्धवेळ नोकऱ्या देणार आहे.
कोरोनानंतर ऑनलाईन मागणीत अभूतपूर्व वाढ झाल्याचे अॅमेझॉनचे वरिष्ठ अधिकारी डेव्ह क्लार्क यांनी ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, की या संकटामुळे रुग्णालय, प्रवास, आदरातिथ्य अशा क्षेत्रातील नोकऱ्यांवर परिणाम झाला आहे.
हेही वाचा-कोरोना : निर्यात ठप्प झाल्याने दररोज १५ हजार क्विंटल केळी पडून
नोकऱ्या गमाविलेल्या लोकांचे आम्ही आमच्या टीमध्ये स्वागत करत आहोत. तसेच ग्राहकांना घरपोच वस्तू देणाऱ्यांना आणि गोदामामधील कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रति ताशी वेतनात वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, अमेरिकेतील ४ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-'COVID 19'चा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम नाही - अनुराग ठाकूर