ETV Bharat / business

जिओ गिगा फायबरवर एअरटेलची कडी; ऑनलाईन मनोरंजन सेवा देणारी 'एक्सस्ट्रीम' लाँच - सेट टॉप बॉक्स

सुनील मित्तल कंपनीने सेट टॉप बॉक्स लाँच केला आहे. यामध्ये इनबिल्ट क्रोमकास्टची सुविधा आहे. एअरटेल एक्सस्ट्रीममध्ये शेकडो सॅटेलाईट्स चॅनेल आहेत. इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषामध्ये हजारो सिनेमे आणि शो असणार आहेत.

सौजन्य - एअरटेल इंडिया
author img

By

Published : Sep 2, 2019, 5:58 PM IST

Updated : Sep 2, 2019, 7:44 PM IST

नवी दिल्ली - जिओ फायबर कंपनीने लाईव्ह टीव्ही व व्हिडिओ सेवा लाँचिग करणार असल्याची घोषणा केली. त्याआधीच जिओची स्पर्धक असलेल्या भारती एअरटेलने ओटीटी स्मार्ट स्टीकवरील एअरटेल एक्सट्रीम, लाईव्ह टीव्ही, न्यूज सेवांची आज घोषणा केली. या सेवेमध्ये सेट टॉप बॉक्स इंटरनेटशी जोडण्यात येणार आहे.

सुनील मित्तल कंपनीने सेट टॉप बॉक्स लाँच केला आहे. यामध्ये इनबिल्ट क्रोमकास्टची सुविधा आहे. एअरटेल एक्सस्ट्रीममध्ये शेकडो सॅटेलाईट्स चॅनेल आहेत. इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषामध्ये हजारो सिनेमे आणि शो असणार आहेत. लाखो गाण्यांसह आणि ओटीटी मनोरंजनाचे अॅप्स आहेत. हा सर्व कटेन्ट टीव्ही, कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनवर उपलब्ध होणार आहे. एअरटेल एक्सट्रीम सेट टॉप बॉक्समध्ये डीटीएच, ओटीटी आणि आयपीटीव्ही कंटेन्ट दिसणार आहे.

एअरटेल एक्स्ट्रीम बॉक्सची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. यासोबत एका वर्षाचे मोफत नोंदणी आहे. त्याचबरोबर एचडी डीटीएच पॅकमध्ये १ महिना नोंदणी मोफत मिळणार आहे. तर एअरटेल टीव्हीचे ग्राहक हे एअरटेल एक्सस्ट्रीम बॉक्स हा खास सवलतीत २ हजार २४९ रुपयांना मिळणार आहे. यासोबत ५०० टीव्ही चॅनेल निवडण्याचा ग्राहकांना पर्याय असणार आहे.

एअरटेल एक्सस्ट्रीम बॉक्समध्ये एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप असणार आहे. त्यामध्ये १० हजारहून अधिक सिनेमे आणि शो असणार आहेत. त्याचबरोबर नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, युट्युब आणि एअरटेल स्टोअर असणार आहे. एक्सस्ट्रीमध्ये ओटीटी माध्यम एकत्रित केले जाणार आहेत. यामध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हंगामा, एरॉस आणि विंक यांचा समावेश आहे. एअरटेलने एक्सस्ट्रीम स्टीक हे ३ हजार ९९९ रुपयात लाँच केले आहे.

एअरटेल एक्सस्ट्रीम बॉक्सला वायफाय आणि ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी असणार आहे. गुगल असिस्टंटच्या व्हॉईस सर्चची सुविधा असलेले युनिव्हर्सल रिमोट असणार आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि ट्युब याचा समावेश आहे.
जिओही नेटफ्लिक्स, हॉट स्टार आदि इंटनेट सेवा असलेल्या ओव्हर द काउंटर सेवा सुरू करणार आहे. जिओच्या ओटीटी सेवेमध्ये जीओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ सावन असणार आहे. याशिवाय गेमिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि व्हर्च्युअरल रिअल्टी इत्यादी सेवांचा समावेश आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
Last Updated : Sep 2, 2019, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.