नवी दिल्ली - सरकारी विमान कंपनी एअर इंडिया आर्थिक संकटात आहे. कंपनीचे कामकाज चालविण्यासाठी एअर इंडियाला २४०० कोटींचे कर्ज घेणार आहे. त्यासाठी एअर इंडियाने केंद्र सरकारकडे कर्जासाठी हमी मागितली आहे.
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियात निर्गुंतवणूक करण्याची सरकार अंतिम प्रक्रिया करत आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडून ७ हजार ६०० कोटींच्या कर्जाची हमी देण्यात येणार आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबरमधील पगाराला उशीर होत असल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा-सध्याच्या स्थितीत बँकांपुढे आव्हाने निर्माण होण्याची शक्यता - शक्तिकांत दास
एअर इंडियाचे खासगीकरण अयशस्वी झाले तर कंपनी बंद करण्यात येईल, असे केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री हरदीप सिंग यांनी राज्यसभेत २७ नोव्हेंबरला सांगितले होते. तर एअर इंडियामधील सर्व कर्मचाऱ्यांचे हितसंरक्षण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते. याबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
हेही वाचा-मोबाईलवरील वस्तू व सेवा कर १,२०० रुपयापर्यंत कमी करावा; आयसीईएची मागणी
एअर इंडियाला आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये अंदाजे ८ हजार ५५६.३५ कोटींचा तोटा झाला आहे. आर्थिक वर्ष २०१२-१३ पासून एअर इंडियाला सरकारने ३० हजार ५२०.२१ कोटींचे अर्थसहाय्य केले आहे.