ETV Bharat / business

सरकारने नवी ऑर्डर दिली नसल्याची माहिती चुकीची; पुढच्या खेपेत ११ कोटी डोस मिळणार - अदर पुनावाला

author img

By

Published : May 3, 2021, 5:40 PM IST

Updated : May 4, 2021, 10:49 AM IST

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी लस उत्पादनाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले, की आपल्या बोलण्याचा विपर्यास केला जात असल्याने काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी सांगाव्या लागत आहेत. लसींचे उत्पादन ही विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे एका रात्रीत लसींचे उत्पादन वाढविणे शक्य नाही.

आदर पुनावाला
आदर पुनावाला

नवी दिल्ली - देशभरात १८ ते ४४ वयोगटासाठी पुरेशी लस उपलब्ध नसताना सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. सरकारने पुढील लसींसाठी सीरमला ऑर्डरच दिली नसल्याचा आरोप समाजमाध्यमांमधून करण्यात येत होता. मात्र हा आरोप खोटा असून, येत्या काही महिन्यात ११ कोटी डोसचा पुरवठा केला जाणार असल्याचे अदर यांनी सांगितले. तसेच एका रात्रीत लसींचे उत्पादन वाढविणे शक्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा करत ट्विटवरून खुलासा केला आहे.

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी लस उत्पादनाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले, की आपल्या बोलण्याचा विपर्यास केला जात असल्याने काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी सांगाव्या लागत आहेत. लसींचे उत्पादन ही विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे एका रात्रीत लसींचे उत्पादन वाढविणे शक्य नाही. भारताची लोकसंख्या मोठी आहे, हेदेखील आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे सर्व प्रौढांसाठी पुरेसे डोस देण्यासाठी उत्पादन करणे सोपे काम नाही. अतिप्रगत देश आणि कंपन्यांही कमी लोकसंख्येकरिता लस उत्पादन करण्यासाठी संघर्ष करत आहे. दुसरी बाब म्हणजे, गतवर्षी एप्रिलपासून आम्ही भारत सरकारबरोबर काम करत आहोत. आम्हाला सर्व प्रकारची म्हणजे वैज्ञानिक, नियमन आणि आर्थिक मदत मिळाली आहे.

हेही वाचा-'शिरच्छेदाची धमकी कुणी दिली हे पुनावालांनी सांगावे' पाहा नाना पटोलेंची संपूर्ण पत्रकार परिषद

अधिक कठोर परिश्रम करून भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्याला बळ देऊ-

आजच्या तारखेपर्यंत आम्हाला २६ कोटी डोससाठी ऑर्डर मिळाली आहे. त्यापैकी १५ कोटी डोसचा आम्ही पुरवठा केला आहे. तसेच आम्हाला पुढील ११ कोटी डोससाठी १०० टक्के आगाऊ रक्कम म्हणून १७३२.५० कोटी रुपये मिळाले आहेत. हे पुढील ११ कोटी डोस दुसऱ्या टप्प्यात येत्या काही महिन्यात राज्य व खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहेत. प्रत्येकाला लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी, अशी इच्छा असल्याचे आम्ही समजू शकतो. हे आमचेदेखील ध्येय आहे. त्यासाठी आम्ही सर्वप्रकारे प्रयत्न करत आहोत. आम्ही अधिक कठोर परिश्रम करून भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्याला बळ देणार आहोत.

हेही वाचा-'धोरणाला पक्षाघात झालेले सरकार कोरोनाला हरवू शकत नाही'

दरम्यान, अदर पुनावाला हे काही दिवसांपूर्वी लंडनला गेले आहेत. त्यांनी इंग्लंडमधील माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत काही श्रीमंत, अत्यंत प्रभावशाली लोकांकडून दबाव निर्माण झाल्याचा दावा केला होता. तसेच विदेशातील प्रकल्पांमधून लस उत्पादन करणार असल्याचे म्हटले होते.

लसींच्या किमतीवरून राज्य व केंद्रात वाद-

सीरम इन्स्टिट्यूटने नुकतेच कोविशील्ड लसीचे दर जाहीर करत 50 टक्के लस खुल्या बाजारात विक्री करण्याचे जाहीर केले होते. यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकार, राज्य सरकार, तसेच खासगी विक्रीसाठी कोविशील्ड लसीचे वेगवेगळे दर जाहीर केले होते. हे दर जाहीर झाल्यानंतर दरांवरून वाद सुरू झाला होता, तसेच काही संघटनांकडून याचा विरोधही केला जात होता. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी हडपसर येथील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रवेशद्वारा जवळ कोविशील्ड लसीचे दर कमी करण्यासाठी निदर्शनेदेखील केली होती. ही सगळी पार्श्वभूमी असताना केंद्र सरकारने अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरविली होती.

संबंधित बातमी वाचा- दर पुनावाला यांनी माहिती द्यावी, पोलीस धमक्यांबाबत तपास करतील - गृहराज्यमंत्री

Last Updated : May 4, 2021, 10:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.