ETV Bharat / business

लशींचा तीव्र तुटवडा असल्याने मोठे संकट; फिक्कीने सरकारला 'हे' सूचविले उपाय

लशींचा मर्यादित साठा असल्याने जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे देशातील संकट अधिक वाढण्याची भीती असल्याचे फिक्कीने म्हटले आहे.

लसीकरण मोहिम
लसीकरण मोहिम
author img

By

Published : May 13, 2021, 8:16 PM IST

नवी दिल्ली - उद्योगांची संघटना फिक्कीने लशीकरणाच्या मंदगतीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. देशात मागणीच्या तुलनेत लशीचा पुरवठा मर्यादित आहे. त्यामुळे देशातील लोकांच्या जीविताला गंभीर धोका झाल्याचे फिक्कीने म्हटले आहे. फिक्कीने लसीकरणाच्या मोहिमेसाठी काही उपाय सरकारला सूचविले आहेत.

परवडणाऱ्या दरात कोरोना लशींचा आणि पुरेसा पुरवठा मिळण्यासाठी देशासमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. लशींचा मर्यादित साठा असल्याने जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे देशातील संकट अधिक वाढण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत कोरोना लस उपलब्ध करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न गरजेचे असल्याचे फिक्कीने म्हटले आहे.

हेही वाचा-नीरव मोदीची मालमत्ता जप्त करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

काय म्हटले आहे फिक्कीने ?

  • लशीच्या उत्पादनासाठी परवाना बंधनकारक करताना त्याचा सावधानतेने वापर करावा.
  • लशींच्या परवान्याचा न्यायिक पद्धतीने वापर झाला नाही तर, त्यामुळे नवसंशोधक कंपन्यांना निरुत्साह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संशोधन आणि विकासामध्ये करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत उलट परिणाम होण्याची शक्यता आहे.
  • जागतिक व्यापार संघटनेच्या माहितीनुसार सदस्य देशांना पेटंट उत्पादने ही परवाना घेऊन उत्पादने करावी लागतात. तसेच बौद्धिक संपदेच्या हक्कांचे संरक्षणही सदस्य देशांना करावे लागते.
  • लस उत्पादनासाठी जागतिक कंपन्यांकडून तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. तसेच स्वदेशी कंपन्यांकडून स्वेच्छेनेलस उत्पादनाचे परवाने परवाने घेऊन मोठ्या प्रमाणात लशींचे उत्पादन घ्यावे, असे फिक्कीने म्हटले आहे.

हेही वाचा-देशाला मिळणारी तिसरी कोरोना लस; स्पूटनिक देशातील बाजारपेठेत पुढील आठवड्यात होणार दाखल

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहिम मंदगतीने सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.