मुंबई - दिल्लीतील सरकारी शाळांमधील शैक्षणिक दर्जाचे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी कौतुक केले आहे. दिल्लीच्या सरकारी शाळांमधून देण्यात येणारे शिक्षण हे खासगी शाळांहून अधिक चांगले आहे, अशा शब्दात त्यांनी कौतुक केले. ते 'प्रथम' या सेवाभावी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात बोलत होते.
सरकारी संस्था या शिक्षणासाठी निधी वाटप करण्यात अधिक उदार राहिल्या आहेत. हे आजवर शिक्षकांच्या पगारीसारख्या बाबीवरून दिसून आले आहे. आता, अधिक चांगली कामगिरी करणाऱ्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे मत अभिजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
-
We welcome Dr Abhijit Banerjee on stage and he has begun with his talk, "Learning from Evidence for a Better Future: The Case of Primary Education." #PrathamTurns25 pic.twitter.com/mY5q0yx0UY
— Pratham Education Foundation (@Pratham_India) January 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We welcome Dr Abhijit Banerjee on stage and he has begun with his talk, "Learning from Evidence for a Better Future: The Case of Primary Education." #PrathamTurns25 pic.twitter.com/mY5q0yx0UY
— Pratham Education Foundation (@Pratham_India) January 11, 2020We welcome Dr Abhijit Banerjee on stage and he has begun with his talk, "Learning from Evidence for a Better Future: The Case of Primary Education." #PrathamTurns25 pic.twitter.com/mY5q0yx0UY
— Pratham Education Foundation (@Pratham_India) January 11, 2020
हेही वाचा-इन्फोसिसमध्ये कोणतेही गैरकृत्य नाही; अंतर्गत लेखापरीक्षणाचा अहवाल
पुढे बॅनर्जी म्हणाले, केंद्र सरकारने शिक्षणाच्या आर्थिक स्त्रोतापेक्षा मानव संसाधन विकासातील सुधारणेवर भर द्यायला हवा. तसेच विद्यापीठ अनुदान आयोग आणि अभ्यासक्रम करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. पैसे ही खरी समस्या नाही. तर शिक्षण व्यवस्था ही खूप कठोर आहे. त्यामध्ये लवचिकता नाही. अर्थसंकल्पाचा सर्वात मोठा खर्च पेन्शन आणि वेतनावर होतो. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा-'खनिज तेलाच्या वाढत्या किमतीबाबत चिंता करण्याची गरज नाही'