ETV Bharat / business

देशातील विमान सेवा २५ मे पासून होणार सुरू; 'हे' आहेत नियम - Airports Authority of India notification

प्रवास करणाऱ्या १४ वर्षांहून कमी वयाच्या मुलांना आरोग्य सेतू अॅप बंधनकारक नसेल. विमानतळ व्यवस्थापनाला टर्मिनल इमारतीमध्ये येण्यापूर्वी प्रवाशांच्या बॅगेचे पूर्ण सॅनिटायझेशन करावे लागणार आहे.

विमान वाहतूक  सेवा
विमान वाहतूक सेवा
author img

By

Published : May 21, 2020, 1:05 PM IST

नवी दिल्ली - भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) विमानतळ व्यवस्थापनांकरता कामकाजासाठी नियम प्रक्रिया (एसओपी) जाहीर केली आहे. देशात २५ मे रोजीपासून विमान वाहतूक सुरू होणार आहे. प्रवाशांना थर्मल स्क्रिनिंग क्षेत्रामधून जाणे बंधनकारक आहे.

प्रवास करणाऱ्या १४ वर्षांहून कमी वयाच्या मुलांना आरोग्य सेतू अॅप बंधनकारक नसेल. विमानतळ व्यवस्थापनाला टर्मिनल इमारतीमध्ये येण्यापूर्वी प्रवाशांच्या बॅगेचे पूर्ण सॅनिटायझेशन करावे लागणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून देशातील १०० हून विमानतळांचे नियमन केले जाते. मात्र, दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद शहरामधील विमानतळाचे नियमन खासगी कंपन्यांकडून केले जात आहे.

हेही वाचा-कोरोनाचा जगाला विळखा; ६ कोटी लोक दारिद्र्यात ढकलले जाणार - जागतिक बँक

देशात टाळेबंदी घोषित केल्याने देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग यांनी देशातील विमान वाहतूक २५ मे रोजीपासून टप्प्याटप्प्याने सुरू करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा-'आर्थिक पॅकेजमधील सुधारणांमागे मोठा गुणाकारात्मक परिणाम साधण्याचे उद्दिष्ट'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.