चंदीगड - एखादा उद्योग अथवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी वयाचे बंधन नसते, हे चंदीगडमधील ९४ वर्षीय आजीबाईंनी दाखवून दिले आहे. हरभजन कौर यांनी घरगुती बेसनची बर्फी तयार केली आहे. ही बर्फी 'हरभजनस' या ब्रँड नावाने बाजारात विकली जात आहे.
हरभजन यांनी आयुष्यात कधीच पैसे कमविले नाहीत, अशी मुलीजवळ खंत व्यक्त केली. त्यांनंतर त्यांच्या मुलीने आईच्या पाककौशल्याला प्रोत्साहन देण्यास सुरूवात केली. त्या म्हणाल्या, आई ही खुप बुद्धिमान आहे. त्यामुळे आम्हाला चॉकलेट खाण्यासाठीही कधी बाहेर जाण्याची गरज भासली नाही. ती स्वयंपाकही छान करते. तिच्या हाताने बनविलेल्या बेसनची बर्फी ही आमची बालपणीची आठवण आहे. त्यामुळे आम्ही तिला बर्फी तयार करण्यासाठी व विक्रीसाठी प्रोत्साहन द्यायचे ठरविले. जे लोक उद्योजक होण्यासाठी सबबी सांगतात, त्यांच्यासाठी हरभजन यांनी वस्तुपाठ घालून दिला आहे.
हेही वाचा-'वित्तिय संकटावर मात करण्याकरता आंतरराष्ट्रीय सहकार्य गरजेचे'
सामान्यत: नव्वदी ओलांडल्यानंतर व्यक्तीला सक्तीची विश्रांती घ्यावी लागते. आरोग्याच्या तक्रारीमुळे फारसे श्रम होत नाहीत. मात्र, ९४ व्या वर्षी हरभजन यांनी दाखविलेल्या उद्योजकतेमुळे त्यांचे कौतुक होत आहे.
हेही वाचा-चीनचा दक्षिण आफ्रिकेतील बाजारपेठेवर डोळा; 'अशी' आहे भारताशी कट्टर स्पर्धा