ETV Bharat / business

गलवानच्या खोऱ्यातील संघर्षानंतर ४३ टक्के भारतीयांची 'चायनामेड'कडे पाठ-सर्वेक्षण

author img

By

Published : Jun 15, 2021, 5:55 PM IST

गतवर्षी गलवानच्या खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले होते. त्यानंतर ग्राहकांच्या वर्तवणुकीबाबत लोकल सर्कल्सने सर्वेक्षण केले आहे.

Chinese products
४३ टक्के भारतीयांची 'चायनामेड'कडे पाठ

नवी दिल्ली - भारत हा चीनवर इलेक्ट्रिक मशिनरी, यांत्रिकी उपकरणांसाठी अवलंबून आहे. असे असले तरी गेल्या ४८ महिन्यांत ४३ टक्के भारतीय ग्राहकांनी चीनच्या उत्पादनांकडे पाठ फिरविली आहे. ही माहिती लोकलसर्कल्सच्या सर्वेक्षणामधून समोर आली आहे.

गतवर्षी गलवानच्या खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले होते. त्यानंतर ग्राहकांच्या वर्तवणुकीबाबत लोकल सर्कल्सने सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये ग्राहकांपुढे कमी किमतीमध्ये चीनी उत्पादने खरेदी करण्याचा पर्याय नव्हता. मात्र, कोरोनामुळे टाळेबंदी लागू असल्याने लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने त्यांच्या खरेदीवर परिणाम झाला. गेल्या १२ महिन्यांत ४३ टक्के ग्राहकांनी चीनी उत्पादने खरेदी केली नाहीत. या सर्वेक्षणाची माहिती ईटीव्ही भारतला मिळाली आहे.

हेही वाचा-पुण्यातील कंपनीने तयार केला कोरोना व्हायसरला निष्क्रिय करणारा मास्क

भारतात चीनप्रमाणे कमी दरात उत्पादने नाहीत!

  • लोकल सर्वेमध्ये देशातील २८१ जिल्ह्यांमधील १८ हजार जणांकडून प्रतिसाद घेण्यात आला. ज्यांनी चीनी उत्पादने यापूर्वी खरेदी केली होती, त्यापैकी ६० टक्के जणांनी १ किंवा २ उत्पादने खरेदी केली आहेत. चीनी उत्पादनांप्रमाणे कमी किमतीत दर्जा असलेली भारतामध्ये उत्पादने उपलब्ध नसल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

हेही वाचा-सोने-चांदी खरेदी करणार आहात, थांबा...जाणून घ्या नवीन नियम

कोरोना महामारीत चीनमधून आयातीचे वाढले प्रमाण

२०२० मध्ये चीनबरोबरील भारताच्या व्यापारात ५.६ टक्क्यांनी घसरण होऊन ८७.६ अब्ज डॉलरचा व्यापार झाला आहे. असे असले तरी जानेवारी-मे २०२१ मध्ये दोन्ही देशांमध्ये आयातीचे प्रमाण ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वेक्षणानुसार वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय ऑक्सिजनची चीनमधून मोठ्या प्रमाणात आयात झाली आहे. भारतामध्ये उपलब्ध झालेले ९० टक्के पल्स ऑक्सिमीटर ही चीनमध्ये उत्पादित झालेले आहेत.

जूनमध्ये केंद्र सरकारने चिनी अ‌ॅपवर बंदी केली होती लागू-

दरम्यान, केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेला आणि सार्वभौमपणाला धोका होत असल्याने ५९ चिनी अ‌ॅपवर जून २०२० मध्ये बंदी लागू केली. तर आणखी १८८ चिनी अ‌ॅपवर सप्टेंबर २०२० बंदी लागू केली आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अ‌ॅपवर बंदी लागू केल्याने देशात हे अ‌ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.