ETV Bharat / business

धक्कादायक! कोरोनच्या संकटाने 'या' क्षेत्रातील ४० टक्के कंपन्या पूर्णपणे बंद पडणार - pandemic impact on Indian companies

सुमारे ८१ टक्के प्रवासी आणि पर्यटन कंपन्यांनी त्यांचा १०० टक्के महसूल गमविल्याचे अहवालात म्हटले आहे. तर १५ टक्के कंपन्यांचा महसूल हा ७५ टक्क्यापर्यंत कमी झाला आहे.

संग्रहित - पर्यटन
संग्रहित - पर्यटन
author img

By

Published : May 25, 2020, 7:28 PM IST

मुंबई - कोरोनाच्या संकटाची कुऱ्हाड रोजगारक्षेत्रासह अनेक कंपन्यांच्या अस्तित्वावरच घाला घालणार आहे. प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील सुमारे ४० टक्के कंपन्या येत्या तीन ते सहा महिन्यात पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. हा टाळेबंदीने परिणाम होणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

विशेष म्हणजे देशांतर्गत विमान सेवा सुरू होवूनही प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील ४० टक्के कंपन्या बंद होण्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. बॉट ट्रॅव्हल कंपनीने आयएओटीओ, टीएएआय, आयसीपीबी, एडीटीओआय या संस्थांबरोबर पर्यटन आणि प्रवासी कंपन्यांची सद्यस्थिती दर्शविणारा अहवाल तयार केला आहे. सुमारे ८१ टक्के प्रवासी आणि पर्यटन कंपन्यांनी त्यांचा १०० टक्के महसूल गमविल्याचे अहवालात म्हटले आहे. तर १५ टक्के कंपन्यांचा महसूल हा ७५ टक्क्यापर्यंत कमी झाला आहे.

हेही वाचा-सुस्साट! हजार एचडी चित्रपट सेकंदात डाऊनलोड करणारी चिप विकसित

हे सर्वेक्षण संपूर्ण देशभरात १० दिवस सुरू राहिले होते. महामारीमुळे सुमारे ३५.७ टक्के कंपन्या तात्पुरत्या काळासाठी बंद होणार असल्याचे सर्वेक्षणामधून दिसून आले. तर ३८.६ टक्के प्रवासी कंपन्या या कर्मचारी कपात करणार आहेत. तर अनिश्चततेच्या काळात ३७.६ टक्के कंपन्या कर्मचारी कपात करण्यावर विचार करत आहेत. बॉट ट्रॅव्हल सर्वेक्षणात २ हजार ३०० प्रवासी आणि पर्यटन कंपन्यांचे मालक व प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

हेही वाचा-देशातील टाळेबंदी वाढविण्यावर आनंद महिंद्रा म्हणाले,...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.