नवी दिल्ली – हिमालयातील उंच भागात प्रतिकूल परिस्थितील लढणाऱ्या सैन्यदलाला ऑनलाईन आव्हानालाही सामोरे जावे लागत आहे. सैन्यदलाविरोधात ट्विटरवर आणि समाज माध्यमातून मोहीम राबविली जात असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून चीनबरोबर पूर्व लडाख आणि उत्तर सिक्कीममध्ये भारताची तणावाची स्थिती आहे. अशा स्थितीत भारतीय सैन्यदलाविरोधात समाज माध्यमात कार्यरत असलेल्या यंत्रणेेविषयी इननेफू या सुरक्षा संस्थेने अभ्यास करून अहवाल तयार केला आहे.
तीन महिन्यांच्या कालावधीत 38 टक्के ट्विट, फेसबुकमधील पोस्ट, युट्युबमध्ये व्हिडिओ हे स्वयंचलित यंत्रणेचा वापर करून तयार केल्याचे दिसून आले आहे.
समाज माध्यमात 6 जून ते 5 जुलै 2020 या कालावधीत 4 हजार 45 प्रोफाईलवरून भारतीय सैन्यदलाच्या विरोधात पोस्ट करण्यात आल्या आहेत. त्यामधील 38 टक्के बोट आणि ट्रोलच्या पोस्ट असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर 1 हजार 366 ट्विटरच्या प्रोफाईलवरून भारतीय सैन्यदलाविरोधात ट्विट करण्यात आहे. हे ट्विटर प्रोफाईल 1 जून 2020 ते 6 जुलै 2020 मध्ये तयार करण्यात आले आहेत.
इननेफू ही सायबर संस्धा भारतीय सरकारबरोबर काम करते. विशेष म्हणजे भारतीय सैन्यदलाविरोधात पोस्ट करणाऱ्या 1 हजार 689 प्रोफाईलमध्ये एकसमानता दिसली आहे. त्या सर्वांचे पाकिस्तानमध्ये नेटवर्क आहे.
सायबर युद्ध हे नव्या प्रकारचे युद्ध आहे. त्यासाठी बॉट्स आणि ट्रॉलचा वापर करण्यात आला आहे. समाज माध्यम आणि सायबर विश्व हे देशांच्या बातम्या आणि प्रतिकात्मक आरसा झाल्याचे अहवालात म्हटले आहे.