ETV Bharat / business

देशभरात कोरोनाने २२९ कर अधिकाऱ्यांचे मृत्यू-अनुराग ठाकूर

author img

By

Published : May 8, 2021, 8:55 PM IST

अनुराग ठाकूर म्हणाले, की संकटाच्या काळात देशाची सेवा बजाविताना तुम्ही जोखीम घेत आहेत. तुमच्याबद्दल देशाला कृतज्ञता राहिल. तुमच्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विविध टिकाणी सुरळित पोहोचू शकत आहेत.

अनुराग ठाकूर
अनुराग ठाकूर

नवी दिल्ली - कोरोना महामारीने प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांचेही मृत्यू होत आहेत. कर्तव्यावर असलेले २२९ कर अधिकाऱ्यांचे मृत्यू कोरोनाने झाल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. या अधिकाऱ्यांबद्दल देश नेहमीच कृतज्ञ राहिल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, की केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क (सीबीआयसी) विभागाच्या ११० अधिकाऱ्यांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) ११९ अधिकाऱ्यांचे महामारीत कर्तव्य बजाविताना मृत्यू झाले आहेत.

हेही वाचा-आरोग्य मंत्रालयाच्या अत्यंत सुस्तावलेपणा आणि चुकीच्या कृतींनी आश्चर्य- आयएमए

काय म्हटले आहे अनुराग ठाकूर यांनी?

अनुराग ठाकूर म्हणाले, की संकटाच्या काळात देशाची सेवा बजाविताना तुम्ही जोखीम घेत आहेत. तुमच्याबद्दल देशाला कृतज्ञता राहिल. तुमच्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विविध टिकाणी सुरळित पोहोचू शकत आहेत. तुमच्या सेवेमुळे देशाच्या व्यवस्थेचे चाक कार्यक्षमतेने फिरत आहे. कोरोना महामारीत सर्वाधिक टीका झालेल्या मंत्रालयापैकी केंद्रीय अर्थमंत्रालय असल्याचेही केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे. अनुराग ठाकूर यांनी मृत अधिकाऱ्यांचे कुटुंबीय व त्यांच्या नातेवाईकांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा-'लोकांचे प्राण जाऊ शकतात, पण पंतप्रधानांची जीएसटी वसूली थांबत नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.