नवी दिल्ली - एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) महाराष्ट्राला रस्ते विकासासाठी २० कोटी डॉलरचे कर्ज देणार आहे. यासंदर्भात बँकेत व केंद्र सरकारमध्ये करार झाला. यामधून महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यामध्ये रस्ते सुरक्षितता आणि चांगले दळणवळण करण्यासाठी रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.
फंड बँक आणि एडीबीचे अतिरिक्त सचिव समीर कुमार खरे आणि केंद्रीय अर्थव्यवहार मंत्री आणि सब्यासची मित्रा, एडीबी इंडियाचे भारत उपसंचालक यांच्यामध्ये हा करार झाला आहे. 'महाराष्ट्र रुरल कनेक्टिव्हिटी इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट'मधून राज्यातील २ हजार १०० किमी मार्गांची अवस्था सुधारेल, असे मित्रा यांनी सांगितले. हे रस्ते सर्व हवामानात चांगले राहतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. तसेच ग्रामीण भागातील जनता ही कृषी आणि सामाजिक-आर्थिक केंद्राशी जोडेल, असेही मित्रा म्हणाले.
हेही वाचा-वाहन उद्योगांना मंदीचा फटका; अशोक लिलँड महाराष्ट्रासह ५ राज्यांतील उत्पादन प्रकल्प ठेवणार बंद
प्रकल्पामध्ये रस्त्यांची कंत्राट पद्धतीने पाच वर्षे देखभाल करण्याची तरतूद आहे. संपर्क यंत्रणा वाढल्याने बाजारपेठ अधिक उपलब्ध होईल. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे खरे म्हणाले. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास महामंडळाला (एमएमआरडीए) १ दशलक्ष कोटी डॉलरचे तांत्रिक सहाय्य दिले जाणार आहे. यामध्ये प्रकल्पावर रिअर टाईम वेबसाईटच्या मदतीने देखरेख करणे व मालमत्ता व्यवस्थापन आदीचा समावेश आहे.
हेही वाचा-वाहन उद्योगावर 'मंदीचे ग्रहण'; प्रवासी वाहनांच्या विक्रीत सलग १० व्या महिन्यात घसरण