ETV Bharat / briefs

यूनिव्हर्स बॉस स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वापरतो हा फंडा, जीमला जाणे केले बंद

या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये त्याने ४९० धावा केल्या आहे.

ख्रिस गेल
author img

By

Published : May 16, 2019, 9:25 AM IST

बार्बाडोस - विंडीजचा स्फोटक ३९ वर्षीय फलंदाज ख्रिस गेल त्याचा शेवटचा आणि पाचवा विश्वकरंडक खेळणार आहे. तो स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नवा फंडा वापरत आहे. हल्ली त्याने जीमला जाणे बंद केले असून तो योगावर भर देत आहे.

यूनिव्हर्स बॉस गेल्या दोन महिन्यांपासून जीमपासून दूर आहे. थकवा दूर करण्यासाठी त्याने योगाला जवळ केले आहे. भरदार शरीरयष्टी असलेला गेल जीमला न जाता विश्रांती करण्यावर अधिक भर देतो.

या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये त्याने ४९० धावा केल्या आहे. तो त्याच्या या कामगिरीबद्दल बोलताना म्हणाला, माझ्या बॅटमधून धावा निघत आहेत. माझ्याकडे खूप अनुभव आहे. मी माझ्या फलंदाजीवर समाधानी आहे. मला आशा आहे, की हीच लय विश्वचषकात कायम राहिल.

गेल्या दोन महिन्यांत मी शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी जास्त लक्ष दिलेले नाही. सध्या मी जीमलाही जात नाही. सध्या विश्रांती घेत असून मालिश करण्यावर भर देत आहे. तसेच स्वत:ला फ्रेश ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

गेल पुढे बोलताना म्हणाला, मी माझ्या फॅन्ससाठी क्रिकेट खेळत आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या डोक्यात फक्त निवृत्तीचा विचार होता. मात्र, माझ्या चाहत्यांनी मला मी अजूनही क्रिकेट खेळावे, अशी विनंती केली. त्याच्यासाठीच मी क्रिकेट खेळत आहे, असेही गेल म्हणाला.

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.