ETV Bharat / briefs

डिप्रेशनमध्ये असताना सुशांतने पूजा साहित्यावर खर्च केले तब्बल 2 लाख - Sushant Singh Rajput suicide case

काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्ती ही ब्लॅक मॅजिक म्हणजेच काळी जादू करीत असल्याचा आरोप सुशांत सिंह राजपूत निकटवर्तीयांनी केला होता . त्यानंतर सुशांत सिंह राजपूत याच्या बँक खात्यातील काही गोष्टी समोर आल्या आहेत. 2019 या वर्षात सुशांत सिंह याने केवळ पूजा साहित्य घेण्यासाठी 2 लाख 2 हजार रुपये खर्च केले आहेत.

सुशांत सिंह राजपूत न्यूज
सुशांत सिंह राजपूत न्यूज
author img

By

Published : Aug 2, 2020, 5:37 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येसंदर्भात मुंबई पोलीस व बिहार पोलीस हे दोघेही वेगवेगळ्या पद्धतीने तपास करीत आहेत. या प्रकरणात बिहार पोलिसांकडे रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर रिया हिच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी माध्यमांमध्ये आता समोर यायला लागल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्ती ही ब्लॅक मॅजिक म्हणजेच काळी जादू करीत असल्याचा आरोप सुशांत सिंह राजपूत निकटवर्तीयांनी केला होता . त्यानंतर सुशांत सिंह राजपूत याच्या बँक खात्यातील काही गोष्टी समोर आल्या आहेत. 2019 मध्ये सुशांत सिंह राजपूत यांच्या बँक अकाउंट मधून मोठ्या प्रमाणात पूजा साहित्य विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे .

या बँक अकाउंट मधून मिळालेल्या तपशीलांनुसार मुंबईतील बांद्रा पाली हिल परिसरात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेत सुशांत सिंह राजपूत याचे बचत खाते होते. या बचत खात्यातून 2019 मध्ये वेगवेगळ्या महिन्यात पूजा साहित्य विकत घेण्यासाठी, पुजाऱ्याची दक्षिणा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. ईटीवी भारतकडे आलेल्या बँक तपशीलांनुसार,

केवळ पूजा साहित्यावर केले लाखो रुपये खर्च

14 जुलै 2019 रोजी पूजा साहित्यावर खर्च झाले तब्बल 45 हजार रुपये

2 ऑगस्ट 2019 रोजी पूजा साहित्यावर खर्च करण्यात आले तब्बल 86 हजार रुपये

8 ऑगस्ट 2019 रोजी पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांना दक्षिणा देण्यात आली तब्बल 11 हजार रुपये

15 ऑगस्ट 2019 रोजी पूजा साहित्यावर खर्च करण्यात आले तब्बल 60 हजार रुपये.

या बरोबरच फिरोज अहमद शहा या व्यक्तीला 11 जुलै 2019 रोजी 5 लाख 27 हजार 777 रुपयांचा चेक देण्यात आला . 14 ऑगस्ट 2019 रोजी 5 लाख 27 हजार 777 फिरोज अहमद शहा यास चेक देण्यात आला आहे. 2019 या वर्षात सुशांत सिंह याने केवळ पूजा साहित्य घेण्यासाठी 2 लाख 2 हजार रुपये खर्च केले आहेत. 2019 मध्ये सुशांत सिंह हा डिप्रेशनमध्ये असताना डॉक्टरांकडे उपचार घेत होता. मात्र, या परिस्थितीत पूजा साहित्यावर एवढा खर्च का करण्यात आला, याचा शोध बिहार पोलिसांकडून केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.