ETV Bharat / briefs

क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी..! 'वानखेडे स्टेडियम सफर’हा उपक्रम पर्यटन विभागाकडून सुरू होणार - Maharashtra Tourism Development Corporation

आता क्रिकेटप्रेमींना मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमची सैर करता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पर्यटनाला चालना देण्यासाठी या नव्या उपक्रमाला मान्यता दिली आहे.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Sep 22, 2020, 9:03 PM IST

मुंबई : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासोबत (एमटीडीसी) 'वानखेडे स्टेडियम सफर’ या उपक्रमाचा प्रस्ताव दिला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनने हा प्रस्ताव स्वीकारला आहे. येत्या काही दिवसांत एमटीडीसी व मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वानखेडे स्टेडीयम सफर’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू करीत आहेत. हा उपक्रम क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रस्ताव स्वीकारल्यानंतर आभार मानले आहेत. ‘पर्यटन विभागाच्या वतीने मुंबई क्रिकेट असोसिएशनला वानखेडे स्टेडियमच्या सफरसाठी विनंती केली होती. ही विनंती एमसीएने क्षणाचाही विलंब न लावता स्वीकारली. जगभरातील पर्यटक आणि क्रिकेटप्रेमींसाठी हा उपक्रम पर्वणी घेऊन येणार आहे. याआधी खासदार शरद पवार व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यासोबत स्टेडियम सफर तसेच मुंबईतून बहरलेल्या क्रिकेटचे संग्रहालय बनवण्याबाबत चर्चा केली होती, यासाठीदेखील एमसीए तयार आहे. यासाठी एमसीएच्या कमिटीचा आभारी आहे’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईमधील वानखेडे स्टेडियम येथे भारताने विश्वचषक जिंकला होता. आपण करू पाहत असलेल्या या सर्व गोष्टी फक्त क्रिकेटप्रेमींसाठीच नव्हे तर प्रत्येक पर्यटकासाठी पर्वणी ठरतील. आम्ही मुंबई इंडियन्स टीमला सुद्धा या उपक्रमाचा भाग होण्यासाठी विनंती करत आहोत, असे ते म्हणाले.

मंत्री ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांच्या प्रयत्नाने हा उपक्रम साकारत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.