ETV Bharat / briefs

गुप्त मतदान प्रक्रियेला हरताळ.. सोशल मीडियावर ईव्हीएमवर मत देतानाचे फोटो व्हायरल - गुप्त

अनेक मतदारांनी ईव्हीएम मशिनवर मतदान करत असल्याचे हे फोटो व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवर व्हायरल केले आहेत.

सोशल मीडियावर ईव्हीएमवर मत देतानाचे फोटो व्हायरल
author img

By

Published : Apr 19, 2019, 10:47 AM IST

अमरावती - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरूवारी पार पडले. मतदान हे गुप्त असावे असा नियम असताना अनेक उत्साही मतदार तरुण -तरुणींनी या नियमांना धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसत आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास तसेच फोटो, चित्रिकरण करण्यास बंदी असताना अनेक मतदारांनी त्यांचे ईव्हीएमवर मत देतानाचे फोटो काढले असून सोशल मीडियावर हे फोटो सध्या व्हायरल केले आहेत.

तसेच डमी मतपत्रिकेवर नवनीत राणांसह आणखी एका उमेदवाराच्या नावापुढे कॅन्सलचा शिक्का मारून तो फोटो व्हायरल केल्याचा गंभीर प्रकार काल समोर आला. हा शिक्का कुणी मारला हे कळले नसले तरी तो व्यक्ती तिथे पोहोचला कसा?? निवडणूक प्रक्रिया पार पाडणारे कर्मचारी कुठे गेले होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या तरुणांवर निवडणूक आयोग काय कारवाई करणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनेक मतदारांनी ईव्हीएम मशिनवर मतदान करत असल्याचे हे फोटो व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवर व्हायरल केले आहेत. त्यामुळे गुप्त मतदान करण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. मतदान कोणाला करावे याचा सर्वस्वी निर्णय मतदाराचा आहे. मात्र, ते कोणाला केले हे इतरांना कळू नये तसेच मतदारालाही कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी ईव्हीएमच्याभोवती बॉक्स केले जाते. तसेच मतदाराने मतदान कक्षात मोबाईल घेऊन जाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांकडून सूचना करण्यात येतात. असे असताना अनेक मतदारांनी उत्साहाच्या भरात मतदान करतानाचे फोटो काढले असून हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मात्र अतिउत्साही तरुणांनी मतदान केंद्रावर मोबाईल नेऊन ईव्हीएम मशिनवर बोट ठेऊन त्याचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. या फोटोत ईव्हीएम मशीनसोबत बोट व मत कोणाला दिले हे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Intro:सोशल मीडियावर ईव्हीएमवर मत देतांनाचे फोटो व्हायलर
निवडणूक विभाग दखल घेईल का?तर तर डमी मतपत्रिकेवर नवनीत राणा सह आणखी एका उमेदवाराच्या नावापुढे कॅन्सल चा शिक्का
गुप्त. मतदान प्रक्रियेला हरताळ

लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान गुरूवारी पाड पडले, मतदान हे गुप्त असावे असा नियम असताना अनेक उत्साही मतदार तरूण तरुणींनी या नियमांना धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसत आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास, तसेच फोटो, चित्रकरण करण्यास बंदी असताना अनेक मतदारांनी त्यांचे ईव्हीएमवर मत देतानाचे फोटो काढले असून सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल केले,
तर तर डमी मतपत्रिकेवर नवनीत राणा सह आणखी एका उमेदवाराच्या नावापुढे कॅन्सल चा शिक्का एका डमी मतपत्रिकेसमोर कुणी मारून तो फोटो वायरल केल्याचा
गंभीर प्रकार काल समोर आला .हा शिक्का कुणी मारला हे कळले नसले तरी तो व्यक्ती तिथे पोहचला कसा निवडणुक प्रक्रिया पार पाडणारे कर्मचारी कुठे गेले होते असा प्रश्न उपस्थित होत आहे.या गंभीर प्रकारा मूळे
या गुप्त मतदान प्रक्रियेत मतदारांनी खेळ बसवल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यात पाहायला मिळाला,त्यामुळे या तरूनावर निवडणूक आयोग काय कारवाई करतील हा प्रश्न उपस्थित होत आहे

अनेक मतदारांनी ईव्हीएम मशिनवर मतदान करत असल्याचे हे फोटो व्हॉटस अ‍ॅप, फेसबुकवर व्हायरल होत असल्यामुळे गुप्त मतदान करण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. ‘मतदान कोणाला करावे’ याचा सर्वस्वी निर्णय मतदाराचा आहे. मात्र, ते कोणाला केले हे इतरांना कळू नये तसेच मतदारालाही कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी ईव्हीएमच्या भोवती बॉक्स केले जाते. तसेच मतदाराने मतदान कक्षात मोबाईल घेऊन जाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकारयांकडून सूचना करण्यात येतात. असे असताना अनेक मतदारांनी उत्साहाच्या भरात मतदान करतानाचे फोटो काढले असून हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मात्र अतिउत्साही तरुणांनी मतदान केंद्रावर मोबाईल नेऊन ईव्हीएम मशीनवर बोट ठेऊन त्याचे फोटो काढून ते फेसबुक व्हाट्सअप या सोशल मीडियावर व्हायरल केले आहे, या फोटोत ईव्हीएम मशीन सोबत बोट व मत कोणाला दिले हे स्पष्टपणे दिसत आहे,त्यामुळे लोकशाहीच्या गुप्त मतदानाला हरताळ फासला गेला आहे त्यामुळे निवडणूक विभागाचे याची दखल घेणे गरजेचे आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.