ETV Bharat / briefs

विराटने बंगळुरूच्या खेळाडूंना दिली पार्टी, अनुष्कानेही केला चांगला पाहुणचार - undefined

देवदत्त केरळचा खेळाडू आहे. त्याला अजून एकही आयपीएलचा सामना खेळण्यास संधी मिळालेली नाही.

युझवेंद्र-विराट-अनुष्का
author img

By

Published : Apr 19, 2019, 9:46 PM IST

मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माने मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर बंगळुरू संघातील खेळाडूंना त्यांच्या घरी पार्टी दिली. दरम्यान, आयपीएलचा ३१ वा सामना १५ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर झाला. हा सामना मुंबईने ५ गडी राखून जिंकला. या सामन्यानंतर रॉयल चॅलेजर्सच्या संघातील खेळाडूंना त्यांनी पार्टी दिली.

बंगळुरूचा खेळाडू युझवेंद्र चहलने डिनरनंतरचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहे. त्याचसोबत डिनर दिल्याबद्दल कोहली दांपत्याचे त्याने आभार मानले. याचसोबत देवदत्त पडिक्कलनेही विराट आणि अनुष्कासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

देवदत्त केरळचा खेळाडू आहे. त्याला अजून एकही आयपीएलचा सामना खेळण्यास संधी मिळालेली नाही. पार्टीनंतर देवदत्तने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, पार्टी दिल्याबद्दल कोहली आणि अनुष्काचे आभार.

या पार्टीत हिम्मत सिंह हादेखील सहभागी झाला. त्यानेदेखील विराट-अनुष्कासोबत काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हिम्मत सिंहने अजून आयपीएलमध्ये पदार्पण केलेले नाही. तो दिल्लीच्या संघाकडून स्थानिक सामने खेळत असतो.

Intro:Body:

Sports NEWS 07

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.