मोहाली - पंजाबचा अष्टपैलू सॅम करन आयपीएलच्या १२ व्या मौसमात हॅटट्रीक घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने दिल्लीविरुद्ध झालेल्या सोमवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने २० धावा केल्या. तर २.२ षटकांची गोलंदाजी करत ११ धावा देत हॅट्रीकसह ४ गडी बाद केले. सॅमने आधी हॅटट्रीक आणि नंतर प्रीती झिंटासोबत मैदानात भांगडा केला.
🕺🕺🕺
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Some bhangra moves there, courtesy @realpreityzinta & @CurranSM 😎😎 pic.twitter.com/VAeXq3I07o
">🕺🕺🕺
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2019
Some bhangra moves there, courtesy @realpreityzinta & @CurranSM 😎😎 pic.twitter.com/VAeXq3I07o🕺🕺🕺
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2019
Some bhangra moves there, courtesy @realpreityzinta & @CurranSM 😎😎 pic.twitter.com/VAeXq3I07o
पंजाबने दिल्ली समोर १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. सॅमने हॅट्ट्रीक घेतल्याने दिल्लीचा संघ १५२ धावांतच तंबूत परतला. विजयानंतर प्रीती झिंटा एवढी आनंदी होती की, ती सॅमची गळाभेट घेत तिने आनंद साजरा केला. त्याच्यासोबत भांगडाही केला.
भांगडा करताना सॅम आणि प्रीति यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाली. ते पाहून सारे फॅन्स जाम खूश झाले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. सॅमने हर्षल पटेल, कागिसो रबाडा आणि संदीप लामिछाने यांना बाद करत हॅटट्रीक घेतली. आयपीएलच्या इतिहासात हॅटट्रीक घेणारा तो १५ वा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी युवराज सिंगने २००९ साली बंगळुरू आणि डेक्कन चार्जर्सविरुद्ध तर अक्षर पटेलने २०१६ साली गुजरात लायंसविरुद्ध हॅटट्रीक घेण्याचा पराक्रम केला आहे.