ETV Bharat / briefs

काही नेत्यांची भूमिका कायम हिंदूविरोधी, कार्यक्रमाला विरोध करून भले होणार नाही- मिलिंद परांडे

author img

By

Published : Jul 30, 2020, 6:49 PM IST

काही राजकीय नेते मंडळी यांची भूमिका ही कायमच हिंदू विरोधी असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे महासचिव मिलिंद परांडे यांनी व्यक्त केले आहे. शिवाय या कार्यक्रमाला विरोध करून कोणाचेही भले होणार नाही. असेही परांडे यांनी सांगितले.

VHP leader Milind parande
VHP leader Milind parande

नागपूर- राममंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला राजकीय रंग चढत असल्याचे पहायाला मिळत आहे. काही राजकीय नेते फक्त राजकारणासाठी या कार्यक्रमाला राजकीय रंग देत असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदचे महासचिव मिलिंद परांडे यांनी केला आहे. कार्यक्रमाला ज्यांनी विरोध केला आहे. त्यांची भूमिका ही नेहमीच हिंदू विरोधी असल्याचा आरोपही मिलिंद परांडे यांनी केला.

5 ऑगस्टला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनावरून आरोप प्रत्यारोप होत असल्याचे पहायला मिळत आहे. नागपुरात विश्व हिंदू परिषदकडून पत्रकार परिषद घेत या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना उत्तर देण्यात आले. काही राजकीय नेते मंडळी यांची भूमिका ही कायमच हिंदू विरोधी असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे महासचिव मिलिंद परांडे यांनी व्यक्त केले आहे. शिवाय या कार्यक्रमाला विरोध करून कोणाचेही भले होणार नाही. असेही परांडे यांनी सांगितले.

हा प्रश्न हिंदूंच्या स्वाभिमानाचा आहे. त्यामुळे विरोध करून कोणाचेही कल्याण झाले नाही. राष्ट्रीय एकात्मतेचा विषय असल्याने हे कार्य केलेच पाहिजे, अशी भूमिकाही परांडे यांनी मांडली. त्याचबरोबर आज कोरोना संकटातही सर्वत्र दारूची दुकानेसुद्धा सुरू आहे. त्यावर कोणी का बोलत नाही ? फक्त 200 लोकांचा कार्यक्रम होण्यात काय नुकसान आहे ? असा सवालही यावेळी परांडे यांनी उपस्थित करत भूमिपूजनाचा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे, शेकडो वर्षांचे संघर्ष या भूमिसाठी लागले आहे. त्यामुळे हा हिंदू समाजासाठी अभिमानाचा क्षण आहे, असेही मिलिंद परांडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या दिवशी सायंकाळी संपूर्ण देशात पुष्पवृष्टी केली जाईल, त्याचबरोबर या दिवसाची सर्वांना आतुरता असल्याचेही परांडे यांनी सांगितले. शिवाय राम जन्मभूमीसाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहूती दिल्यानंतर हा दिवस उजाडला आहे. त्यामुळे जल्लोष करण्याचा हा क्षण राहील. त्यामुळे, राजकीय नेत्यांनी याला विरोध केला, तरी हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडेल, असेही मिलिंद परांडे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.