ETV Bharat / briefs

सातारा: गोंडवल्यात दोन जण लग्नाला गेले अन् कोरोना गावात घेऊन आले, परिसरात महामारीची भीती

संबंधित कुटुंब गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील एका गावातील लग्नात उपस्थित होते. घरी परतल्यानंतर त्रास होऊ लागल्याने कुटुंबातील सर्वच 6 जणांना विलगीकरणात पाठविण्यात आले होते. या सर्वांचा स्वॅबचा अहवाल काल रात्री प्राप्त झाला. त्यामध्ये 2 जण बाधित असल्याचे निदर्शनास आले. हे कुटुंब गावातील अगदी मध्यवर्ती भागात राहत असल्याने संपूर्ण गाव हादरून गेले आहे.

Corona satara
Corona satara
author img

By

Published : Jul 20, 2020, 4:23 PM IST

सातारा - गेल्या काही दिवसांपासून आसपासच्या वस्त्यांवर घुटमळलेला कोरोना आज थेट गोंदवल्याच्या मध्यवस्तीतच घुसला. लग्नाला जाऊन आलेल्या कुटुंबातील 2 जणांचा अहवाल कोरोनाबधित आल्याने आता सर्वांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. बाधितांच्या निकट सहवासातील 5 जणांना आज विलगीकरणात पाठवण्यात आले असून आत्तापर्यंत वस्तीत 9 जण कोरोनाबधित आढळले आहेत.

कोरोना प्रादुर्भाव वाढत असतानाही गोंदवल्यात मात्र कडक उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु बाहेरून आलेल्यांपैकी एक महिला बाधित झाली होती. परंतु अल्पावधीतच ती बरी होऊन घरी परतल्यावर ग्रामस्थांना हायसे वाटले होते. त्यानंतर मात्र गावी येऊन गेलेल्या मुंबईकरासह पुण्यातील लग्नात हजर असणारे व त्यांच्या निकट सहवासात असलेल्यांपैकी 6 जण कोरोनाबाधित झाले. यातील दोघे जण बरे होऊन घरी परत आल्यानंतर आज आणखी 2 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 75 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

संबंधित कुटुंब गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील एका गावातील लग्नात उपस्थित होते. घरी परतल्यानंतर त्रास होऊ लागल्याने कुटुंबातील सर्वच 6 जणांना विलगीकरणात पाठविण्यात आले होते. या सर्वांचा स्वॅबचा अहवाल काल रात्री प्राप्त झाला. त्यामध्ये 2 जण बाधित असल्याचे निदर्शनास आले. हे कुटुंब गावातील अगदी मध्यवर्ती भागात राहत असल्याने संपूर्ण गाव हादरून गेले आहे.

आज सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, महसूलचे तुषार पोळ यांनी पाहणी करून परिसर सील केला आहे. विवाहात सहभागी असलेल्यांसह बाधितांच्या निकट सहवासातील 5 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.