ETV Bharat / briefs

१५ जूनला शाळांमध्ये हजर होण्याच्या आदेशाविरोधात शिक्षक संघटना एकवटल्या

author img

By

Published : Jun 13, 2020, 10:32 PM IST

शिक्षकांना शाळांमध्ये बोलवण्यात आले तर कोरोनाचा धोका होऊ शकतो यासाठी सरकारने फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री, शालेय शिक्षण विभागाला पत्र लिहिले आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शाळा उशिरा सुरू कराव्यात आणि शिक्षकांना सध्याच्या परिस्थितीत शाळांमध्ये बोलावण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई - राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने जुलै महिन्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वीच राज्यातील शिक्षण विभागाने शिक्षकांना १५ जूनला आपल्या शाळांमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव वेगाने वाढत असताना शाळांमध्ये हजर राहण्याच्या या आदेशाला शिक्षक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

राज्यातील शैक्षणिक सत्राची सुरूवात सोमवारी १५ जूनला होणार असून त्या दिवसापासून ऑनलाईन शिक्षणाचा सुरूवात केली जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना शाळांमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना, शिक्षक भारती, मुंबई मुख्याध्यापक संघटना, शिक्षक परिषद आणि भाजप शिक्षक आघाडीनेही विरोध दर्शविला आहे. मुंबई, पुणे आदी शहरांपासून ते ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव हा वेगाने वाढत असताना शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहण्याचे देण्यात आलेले आदेश हे चुकीचे असून त्यावर तात्काळ फेरविचार केला जावा, अशी मागणी शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनी केला आहे.

शिक्षकांना शाळांमध्ये बोलवण्यात आले तर कोरोनाचा धोका होऊ शकतो यासाठी सरकारने फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री, शालेय शिक्षण विभागाला पत्र लिहीले आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शाळा उशिरा सुरू कराव्यात आणि शिक्षकांना सध्याच्या परिस्थितीत शाळांमध्ये बोलावण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.

शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाने शाळांमध्ये शिक्षकांना उपस्थित राहण्याच्या विरोधात शिक्षकांची 'नो स्कूल फॉर एनी वन... धीस लॉकडाऊन पिरीयड' नावाची मोहीम उघडली आहे. या मोहिमेत अनेक शिक्षक सहभागी झाले असून त्यांनी सोमवारी शाळांमध्ये हजर न राहण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप शिक्षक आघाडीचे मुंबई प्रमुख अनिल बोरनारे यांनीही मुंबईत लोकल सेवा सुरू नाही, अनेक व्यवहार अजूनही ठप्प असल्याने शिक्षकांना शाळांमध्ये बोलावण्याची घाई करू नये, अशी मागणी केली आहे.

शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांपूर्वीच पत्र लिहून शाळांमध्य शिक्षकांना बोलावणे धोक्याचे असून कोरोनाचे संकट टळेपर्यंत त्यांना बोलावण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.