ETV Bharat / briefs

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक : निकालाच्या दिवशी प्रशासनाकडून कडक निर्बंध - pandharpur mangalvedha assembly byelections verdict

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल 2 मेला लागणार आहे. त्या मतमोजणी केंद्रावर अधिकृत पासधारक व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे.

Pandharpur mangalvedha assembly byelection
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक
author img

By

Published : Apr 30, 2021, 4:49 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल व मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. त्या मतमोजणी व निकालाच्या दिवशी जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये पंढरपूर शहरात कोणत्याही नागरिकाला अधिकृतपणे प्रवेश दिला जाणार नाही. तसेच विजयी उमेदवारांना रॅली, विजयी मिरवणूक काढणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

मतमोजणी केंद्रांच्या आवारात अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश -

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल 2 मेला लागणार आहे. त्या मतमोजणी केंद्रावर अधिकृत पासधारक व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. मतदान केंद्र परिसरामध्ये ही कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. त्याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने अधिक प्राधिकृत पासधारक व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात 144 कलम लागू..

निकालावेळी याठिकाणी गर्दी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून एक मे रात्री साडे अकरा पासून ते दोन मेच्या रात्री बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आली आहे. यामुळे कोणत्याही नागरिकाला विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही. नागरिकांनी गर्दी करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

मिरवणूक, गुलाल उधळणे, घोषणा देणे, फटाके फोडण्यावर बंदी -

निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांना पंढरपूर शहर व तालुक्यात कोणत्याही प्रकारची रॅली, मिरवणूक, गुलाल उधळणे, घोषणा देणे, फटाके वाजवणे, बॅनर बाजी करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच विजयी उमेदवाराला निवडणुकीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी दोन व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच पंढरपूर शहरात निवडणुकीच्या कामासाठी ओळखपत्राशिवाय प्रवेश करण्यास मनाई आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.