सिडनी - इंग्लंडमध्ये ३० मेपासून आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेला सुरुवात होत आहे. पण या स्पर्धेपूर्वी गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. युवा वेगवान गोलंदाज जे. रिचर्डसन या दुखापतीमुळे विश्वकरंडकातून बाहेर पडला. आता माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला दुखापत झाली आहे.
स्टीव्ह स्मिथला न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात ही दुखापत झाली. त्याची ही दुखापत ऑस्ट्रेलिया संघास महागात पडू शकते. त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप समजू शकले नाही. स्मिथने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही सराव सामन्यात अनुक्रमे ८९ आणि नाबाद ९१ धावा केल्या आहेत. तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे.
आयपीएलदरमन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात स्मिथने एक झेल टीपण्यासठी सूर मारला होता. त्यावेळी त्याला ही दुखापत झाली. यापूर्वी स्मिथने जानेवारीत त्याच्या हाताच्या कोपऱ्यावर शस्त्रक्रिया करून घेतली होती. स्मिथची ही दुखापत गंभीर असल्यास त्याला विश्वकरंडकात बाहेर बसावे लागेल. परंतु ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगरने स्मिथच्या फिटनेसचे कौतुक केले आहे.