पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आज (रविवारी) शहरात नव्याने 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात दोन वृद्ध महिलांचा उपचारादरम्यान कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 768 वर पोहचली असून पैकी 438 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोन मधून वगळण्यात आले असले तरी कोरोनाच्या रूग्णांची संख्या आटोक्यात येण्याऐवजी वाढतच आहे. रविवारी दिवसभरात शहरात 62 कोरोनाबाधितांची भर पडली असून दोन वृद्ध महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात एकूण 768 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यामध्ये शहरातील 438 तर शहराबाहेरील 59 रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. रविवारी दिवसभरात बाधित आढळले रुग्ण हे आनंदनगर, अजंठानगर, दापोडी, काळेवाडी, पिंपरीगांव, जुनी सांगवी, पाटीलनगर चिखली, फुलेनगर, बालाजीनगर, रहाटणी, वाकड, दळवीनगर, पिंपरी स्टेशन, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, पवनानगर पुणे आणि मुंबई येथील रहिवासी आहेत.
गेल्या तीन दिवसात वाढलेली करोना बाधितांची आकडेवारी, डिस्चार्ज आणि मृत्यू
०६ जून- ३८ जण करोना बाधित, एकाचा मृत्यू, ३६ जण करोनामुक्त
०५ जून- ४५ जण करोना बाधित, दोघांचा मृत्यू, ३५ जण करोनामुक्त
०४ जून- ५८ जण करोना बाधित, एकाचा मृत्यू, तर ४७ जण करोनामुक्त