विशाखापट्टणम - दिल्लीला हारवून चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात १०० वा विजय मिळविला आहे. आयपीएलमध्ये १०० विजय मिळविण्याची कामगिरी करणारा चेन्नई हा दुसरा संघ बनला आहे. यापूर्वी हा कारनामा मुंबई इंडियन्सने केला होता. या विजयासह चेन्नईने दिल्लीच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले.
- हरभजन सिंग आयपीएलमध्ये १५० बळीचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा खेळाडू बनला आहे.
- हरभजन सिंगने आयपीएलमध्ये १५० बळी घेणारा पहिला ऑफ स्पिनर ठरला आहे. यापूर्वी कोणत्याच ऑफ स्पिनर खेळाडूला १५० बळी घेता आले नाही.
- चेन्नईने काल आठव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे, अशी कामगिरी करणारा चेन्नई सुपर किंग्ज पहिला संघ आहे.
- हरभजन सिंग दिल्लीविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने लसिथ मलिंगचा २२ विकेट घेण्याचा विक्रम मागे टाकला असून २३ बळीची मिळविले आहेत.
- वेगवान गोलंदाज इशांत शर्माने ९ वर्षानंतर पहिल्यांदा आयपीएलमध्ये षटकार मारला आहे.