ETV Bharat / briefs

जळगाव येथील श्री स्वामी नारायण मंदिर संस्थानतर्फे 1250 रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया

श्री स्वामी नारायण मंदिर संस्थानतर्फे विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात.संस्थानतर्फे नुकतेच 1 हजार 250 गरजू रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली.

श्री स्वामी नारायण मंदिर संस्थानचे शास्त्री नयन प्रकाशदास
author img

By

Published : Jun 7, 2019, 11:33 AM IST

Updated : Jun 7, 2019, 12:46 PM IST

जळगाव - श्री स्वामी नारायण मंदिर संस्थानतर्फे नुकतेच 1 हजार 250 गरजू रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. विमल रघुनाथ पाटील नेत्रालयाच्या माध्यमातून ही मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती संस्थानचे शास्त्री नयन प्रकाशदास यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री स्वामी नारायण मंदिर संस्थानचे शास्त्री नयन प्रकाशदास
श्री स्वामी नारायण मंदिर संस्थानतर्फे विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. त्यात भगवान स्वामीनारायण जन्मोत्सव, गुरुपौर्णिमा उत्सव, हीडोळा उत्सव, श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोवर्धन पूजा तसेच रामनवमी उत्सव यासारख्या धार्मिक उत्सवांचा समावेश असतो. सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीने संस्थानच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमदेखील राबवले जात असतात. बालकांवर बालवयातच चांगले संस्कार व्हावेत, या उद्देशाने संस्थानच्यावतीने वर्षभरात वेळोवेळी बाल संस्कार शिबिरांचे देखील आयोजन करण्यात येते. वृक्षारोपण, पाणी अडवा, पाणी जिरवा यासारख्या उपक्रमांमध्येही संस्थानचा सहभाग असतो. त्याचप्रमाणे विविध तालुक्यांमध्ये भागवत सप्ताह, पारायणाचे आयोजन करण्यात येऊन नागरिकांवर धार्मिक संस्कार करण्याचे कार्यही केले जातात, असे शास्त्री नयन प्रकाशदास म्हणाले.

Intro:जळगाव
शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या श्री स्वामी नारायण मंदिर संस्थानतर्फे धार्मिक उत्सव साजरे करण्यासोबतच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. विमल रघुनाथ पाटील नेत्रालयाच्या माध्यमातून संस्थानतर्फे नुकतेच 1250 गरजू रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती संस्थानचे शास्त्री नयन प्रकाशदास यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Body:शास्त्री नयन प्रकाशदास पुढे म्हणाले की, श्री स्वामी नारायण मंदिर संस्थानतर्फे विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. त्यात भगवान स्वामीनारायण जन्मोत्सव, गुरुपौर्णिमा उत्सव, हीडोळा उत्सव, श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोवर्धन पूजा तसेच रामनवमी उत्सव यासारख्या धार्मिक उत्सवांचा समावेश आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीने संस्थानच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम ही सातत्याने राबविले जात असतात. बालकांवर बालवयातच चांगले संस्कार व्हावेत, या उद्देशाने संस्थानच्या वतीने वर्षभरात वेळोवेळी बाल संस्कार शिबिरांचे देखील आयोजन करण्यात येते. वृक्षारोपण, पाणी आडवा, पाणी जिरवा, यासारख्या उपक्रमांमध्येही संस्थानचा हिरीरीने सहभाग असतो, असेही शात्री नयन प्रकाशदास म्हणाले.

Conclusion:श्री स्वामीनारायण मंदिर संस्थानच्या वतीने जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये भागवत सप्ताह, पारायणाचे आयोजन करण्यात येऊन नागरिकांवर धार्मिक संस्कार करण्याचे देखील कार्य केले जाते, असेही शास्त्री नयन प्रकाशदास यांनी सांगितले.
Last Updated : Jun 7, 2019, 12:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.