ETV Bharat / briefs

कोरोना झाल्याचा अभिनेते सतिश शाह यांचा खुलासा; तंदुरुस्त झाल्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानले आभार

author img

By

Published : Aug 9, 2020, 5:26 PM IST

Updated : Aug 9, 2020, 5:49 PM IST

20 जुलै रोजी शाह यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर 28 जुलैला चाचणी निगेटिव्ह आल्यावर घरी सोडण्यात आले होते.

सतिश शाह
सतिश शाह

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते सतिश शाह यांनी मागील(जुलै) महिन्यात कोरोनाची लागण झाल्याचा खुलासा केला आहे. उपचारानंतर बरे झाल्यानंतर त्यांनी डॉक्टर आणि नर्सचे आभार मानले आहेत. 20 जुलै रोजी शाह यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर 28 जुलैला चाचणी निगेटिव्ह आल्यावर घरी सोडण्यात आले. मात्र, त्यांना कोरोना झाल्याचा खुलासा केला आहे.

69 वर्षीय शाह यांना शराबी vs शराबी आणि ‘ये जो है जिंदगी’ या मालिकेतील अभिनयासाठी ओळखले जातात. या सोबतच त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांत भूमिक केल्या आहेत. 'मी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. नियमानुसार मी 11 ऑगस्टपर्यंत क्वारंटाईनमध्ये आहे. मला ताप आला होता. मात्र, मी औषध घेतल्याने ताप कमी झाला. मात्र, नंतर मला डॉक्टरांनी कोरोना चाचणी करण्यास सांगितले. तेव्हा माझी चाचणी पॉझिटिव्ह आली, असे शाह यांनी सांगितले.

कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात भरती होण्याचा मी सल्ला देईल. तेथे तुमची सतत काळजी घेतली जाते. त्यामुळे पुढे येणाऱ्या अडचणीही टाळता येतात. या मध्ये काहीही घाबरण्यासारखे नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच रुग्णालयात काळजी घेतल्याबद्दल शाह यांनी डॉक्टर आणि नर्सचे ट्विटरवरून आभार मानले.

Last Updated : Aug 9, 2020, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.