मुंबई - क्रिकेटचा देवता सचिन तेंडुलकर कित्येक वर्षानंतर मैदानात गोलंदाजी करताना दिसून आला. विशेष म्हणजे त्याने आपला बालपणीचा मित्र विनोद कांबळीला गोलंदाजी केली. डीवाय पाटील स्टेडियमवर गोलंदाजी करतानाचा हा व्हिडिओ सचिनने त्याच्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट केला आहे.
सचिनने या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले, की कांबळीला नेट्समध्ये गोलंदाजी करताना खूप छान वाटले. आमच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. सचिन आणि कांबळी शारदाश्रम विद्या मंदिरकडून शालेय क्रिकेट खेळत होते.
तेंडुलकरच्या या व्हिडिओला आयसीसीने गंमतीशीर रिप्लाय दिला आहे. आयसीसीने प्रसिध्द पंच स्टिव्ह बकनर याचा नोबॉलचा इशारा देतानाचा फोटो टाकला आहे. सचिन गोलंदाजी करत होता तेव्हा त्याचा पाय क्रिझच्या बाहेर दिसून आला. त्यामुळे आयसीसीने सचिनला फोटो कॅप्शनमधून फ्रंट फूट पाहण्यास सांगितले आहे. एकंदरीतच सचिनचा चेंडू नोबॉल देण्याकडे आयसीसीचा इशारा आहे. यावरून हा व्हिडिओ आससीसीने बारकाईने पाहिला असे लक्षात येते.