रत्नागिरी - जिल्ह्यात काल (सोमवारी) आलेल्या अहवालानुसार गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 324 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 17 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
324 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह -
जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, आलेल्या अहवालानुसार गेल्या 24 तासांत जिल्ह्यात रुग्णसंख्या काहीशी कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. गेले काही दिवस 500 ते 600 रुग्ण रोज सापडत होते. मात्र, सोमवारी नव्याने आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 324 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 23 हजार 626 जाऊन पोहोचली आहे.
सोमवारी आलेल्या अहवालानुसार, 199 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 125 रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. दरम्यान, आज सापडलेल्या 324 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 186, दापोली 21, खेड 4, गुहागर 15, चिपळूण 19, संगमेश्वर 43, राजापूर 16 आणि लांजा तालुक्यात 20 रुग्ण सापडले आहेत.
17 जणांचा मृत्यू -
दरम्यान, मागील 24 तासांत जिल्ह्यात तब्बल 17 कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 698 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.95 टक्के इतके आहे. जिल्ह्यात 386 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 16 हजार 391 हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 69.37 टक्के आहे. जिल्ह्यातील जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 15.29 टक्के आहे.