ETV Bharat / briefs

अरविंद बनसोड यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करा - रामदास आठवले - nagpur news

आंबेडकरी तरुण अरविंद बनसोड (वय 32 ) याच्या संशयास्पद झालेल्या मृत्यू प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आठवले यांनी सोमवारी नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकांना दूरध्वनीवरून याप्रकरणी लक्ष देऊन गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली.

mumbai news
ramdas athawale
author img

By

Published : Jun 8, 2020, 8:48 PM IST

मुंबई - नागपूरच्या नरखेडमधील पिंपळधरा गावातील यूपीएससीचा विद्यार्थी अरविंद बनसोड यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले सखोल चौकशी करण्याची सुचना केली आहे. या प्रकरणी गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी. आरोपींवर अ‌ॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी. तसेच क्राईम ब्रँचच्या सक्षम अधिकाऱ्यांमार्फत या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्याची सूचना आठवले यांनी नागपूरचे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राकेश ओला यांना केली आहे.

आंबेडकरी तरुण अरविंद बनसोड (वय 32 ) याच्या संशयास्पद झालेल्या मृत्यू प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आठवले यांनी सोमवारी नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकांना दूरध्वनीवरून याप्रकरणी लक्ष देऊन गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली. अरविंद बनसोड संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोपींवर अ‌ॅट्रोसिटी तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी जबाबदार धरून गुन्हा दाखल करावा अशी सुचना केली आहे. तसेच आरोपींचा अटक पूर्व जlमीन रद्द करावा किंवा त्याची मुदत संपताच आरोपींना त्वरीत अटक करावी. अरविंद बनसोड यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही आठवले यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.