ETV Bharat / briefs

प्लाझ्मा डोनेशन ही कोरोना रुग्णांसाठी संजीवनी - मुंबई पालिका आयुक्त - मुंबई महानगर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल

मुंबईमधील हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमधील 2 हजार 100 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यांच्यापैकी 400 ते 500 बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्याची तयारी दर्शवली आहे. यापैकी काही दात्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित प्लाझ्मा दान केले.

प्लाझ्मा थेरपी
प्लाझ्मा थेरपी
author img

By

Published : Jul 28, 2020, 12:29 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचे रुग्ण रोज आढळून येत असले तरी आतापर्यंत 85 हजार रुग्ण बरे झाले आहेत. या बरे झालेल्या रुग्णांनी आपला प्लाझ्मा दान केल्यास जे गंभीर आजारी आहेत ते बरे होऊ शकतात. प्लाझ्मा डोनेशन ही कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी संजीवनी असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी म्हटले आहे. प्लाझ्मा दान ही एक उत्तम सेवा असल्याने आपल्या मित्र नातेवाईकांनाही प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.

मुंबईमधील हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमधील 2 हजार 100 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यांच्यापैकी 400 ते 500 बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्याची तयारी दर्शवली आहे. यापैकी काही दात्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित प्लाझ्मा दान केले. त्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत पालिका आयुक्तांच्या हस्ते या दात्यांना प्लाझ्मा डोनरचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्यानंतर पालिका आयुक्त बोलत होते.

यावेळी बोलताना आयुक्त म्हणाले की, रक्तदान केले जाते त्याच प्रमाणे प्लाझ्मा दान केला पाहिजे. प्लाझ्मा दान करताना जो कोरोना रुग्ण बरा झाला आहे त्या दात्याच्या विविध चाचण्या केल्या जातात. कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या त्याच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का? आदी चाचण्या केल्या जातात. त्यात तो रुग्ण प्लाझ्मा देण्यास फिट असल्यास त्याचा प्लाझ्मा घेतला जातो. 100 रुग्णांची तपासणी केल्यावर 25 ते 30 प्लाझ्मा दाते मिळतात. आतापर्यंत धारावीमधून 29 दाते मिळाले आहेत. पालिकेच्या केईएम, नायर आणि सायन रुग्णालयात या दात्यांकडून प्लाझ्मा घेतला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

प्लाझ्मा दान करा -

धारावीमधील दात्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे अभिनंदन, आभार व्यक्त करत या प्लाझ्मामुळे अनेक लोकांना जीवनदान मिळणार आहे. सध्या लस आली नसल्याने प्लाझ्मा देऊन जीव वाचवणे हाच मार्ग असल्याने ही एक संजीवनी आहे. यामुळे अनेक जण बरे होणार आहेत, असे आयुक्त म्हणाले. प्लाझ्मा दान ही एक उत्तम सेवा असल्याने आपल्या मित्र नातेवाईकांनाही प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. बरे झालेले रुग्ण मोठ्या संख्येने दाते म्हणून पुढे आल्यास येत्या 4 ते 6 महिन्यात प्लाझ्मा बँकेत मोठ्या प्रमाणात जमा होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

धारावीला कोरोनाचा हॉटस्पॉट बोलले जात होते. येथील नागरिकांना मुंबईकर धारावीतील कोरोनाग्रस्त म्हणून हिणवत होते. आज तेच धारावीकर मुंबईकरांच्या मदतीला धावून आले आहेत. धारावीमधून 2 हजार 100 रुग्ण बरे झाले आहेत. 400 ते 500 बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यापैकी 120 जणांची तपासणी करण्यात आली असता 29 जण प्लाझ्मा देण्या योग्य असल्याचे समजले आहे. चेंबूर गोवंडी येथीलही 20 जण प्लाझ्मा देण्यास योग्य ठरले आहे. या सर्वांचा प्लाझ्मा पालिका रुग्णालयात दिला जाणार आहे. प्लाझ्मा दान केल्याने सुमारे 15 हजार लोकांना वाचवता येऊ शकते. हा एक आशेचा किरण असल्याचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.