ETV Bharat / briefs

पुणे- नाशिक महामार्गावर कोंबड्यांच्या पिल्लांचा पीकअप पलटी

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कोंबड्याची पिल्ले घेवून जाणारा पिकअप पलटी झाला. ही घटना शनिवार दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली आहे.

पीकअप पलटी
पीकअप पलटी
author img

By

Published : Apr 10, 2021, 7:13 PM IST

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कोंबड्याची पिल्ले घेवून जाणारा पिकअप पलटी झाला. ही घटना शनिवार दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली आहे. या अपघातात अनेक कोंबड्यांची पिल्ले दगावली आहेत.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की एम एच 12 क्यूम 9740 या पिकअपचा चालक पुणे येथून बाॅक्स मध्ये कोंबड्यांची पिल्ले घेवून शनिवारी पहाटे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाने संगमनेरकडे जात होता. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पिकअप गुजांळवाडी जवळ आला. यावेळी रस्त्याच्या दुभाजकाला धडकून हा अपघात झाला.

एक जखमी, अनेक पिल्ले दगावली

या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला आहे. महामार्गावर कोंबड्यांची पिल्ले मोठ्याप्रमाणात पडली होती. यामध्ये अनेक पिल्ले दगावली आहेत. अपघात झाल्याची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, मनेष शिंदे, अरविंद गिरी, योगीराज सोणवने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन टोल नाक्याच्या क्रेनने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत चालू केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.