दुबई - नामाबिया आणि पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाना एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा देण्यात आला आहे. नामीबिया आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन-२ स्पर्धेत हाँगकाँगला तर पापुआ न्यू गिनीने ओमानला हरवत एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा मिळविला. आयसीसीने त्यांच्या संकेत स्थळावर याची माहिती दिली आहे.
नामीबिया २००३ विश्वचषकानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहेत. नामीबियाने प्रथम फंलदाजी करताना जेपी कोट्जेच्या १४८, स्टीफन बार्डच्या १२२ धावांच्या जोरावर ५० षटकात ३ बाद ३९६ धावा रचल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ २४५ धावा बाद झाला आणि हा सामना १५१ धावांनी जिंकला.
दुसऱ्या सामन्यात पापुआ न्यू गिनीने ओमानला नमविले. पापुआ न्यू गिनीने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २२१ धावा केल्या. त्यानंतर ओमानचा संघ ७६ धावांवर आटोपला. पापुआ न्यूगिनीने हा सामना १४५ धावांनी जिंकला. या दोन्ही देशांनी आयसीसी वर्ल्डकप डिव्हिजन २ मध्ये स्थान मिळविले आहे.
आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन २ मध्ये ओमानच्या संघाने ५ पैकी ४ सामन्यांत विजय मिळवत ८ गुण मिळविले. नामीबिया ४ पैकी ३ सामन्यात विजय मिळवित ६ गुणांची कमाई केली आहे. अमेरिका ४ पैकी ३ सामन्यात विजय मिळवून ६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पापुआ न्यू गिनी ५ पैकी २ विजय आणि २ पराभवासह चौथ्या स्थानावर आहे. कॅनडा आणि हाँगकाँग सहाव्या स्थानावर आहे.