ETV Bharat / briefs

मुंबईत लसीचा तुटवडा; आज १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू तर ४५ वर्षांवरील बंद - मुंबई कोरोना लस तुटवडा बातमी

आज १८ ते ४४ या वयोगटातील लाभार्थ्यांचे ५ लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जाणार असून प्रत्येक केंद्रांवर ५०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे.

Mumbai corona vaccinations
मुंबई कोरोना लसीकरण
author img

By

Published : May 3, 2021, 8:44 AM IST

मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू असल्याने लसीचा तुटवडा आहे. यामुळे पालिकेने ४५ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण बंद केले आहे. मात्र, त्याचवेळी १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे.

आज १८ ते ४४ या वयोगटातील लाभार्थ्यांचे ५ लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जाणार असून प्रत्येक केंद्रांवर ५०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. कोविन ऍपवर संदेश आले आहेत अशा लाभार्थ्यांनाच लस दिली जाणार असल्याने इतर लोकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

१८ वर्षावरील लाभार्थ्यांचे लसीकरण -

कोविड-१९ लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवर आज सोमवार दिनांक ३ मे रोजी ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे लसीकरण होणार नाही. तर १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सध्याच्या पद्धतीप्रमाणे ५ केंद्रांवर सुरू राहील. ज्यांची कोविन अँपमध्ये नोंदणी झालेली आहे आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ (slot) दिलेला आहे, त्यांनाच लसीकरण केंद्रावर
लस मिळणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लसीचा तुटवडा -

सध्या सर्व वयोगटातील नागरिक लसीकरण केंद्रावर मोठ्या स्वरूपात गर्दी करत आहेत, कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर आणि लसीकरण केंद्रावर येऊ नये. पालिका प्रशासनाकडून लस उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून लसीचा साठा प्राप्त होताच नागरिकांना कळविण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार त्यावेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि नागरिकांना कळविले जाईल. मुंबईकरांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

५ लसीकरण केंद्रावर लसीकरण -

कोविड-१९ लसीकरण मोहिमेसाठी मुंबईत, बृहन्मुंबई महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे ६३ केंद्रे तसेच खासगी रुग्णालयात ७३ अशी एकूण १३६ कोविड-१९ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत कोविड प्रतिबंध लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्या कारणामुळे महानगरपालिका, शासकीय आणि खासगी कोविड लसीकरण केंद्रात आज सोमवार, दिनांक ३ मे रोजी ४५ वर्षे आणि त्यावरील वयाच्या नागरिकांचे लसीकरण होवू शकणार नाही. दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ५ लसीकरण केंद्रावर प्रत्येकी ५०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ते सकाळी ९ ते ५ या नियमित वेळेत सुरू राहील. हे लसीकरण केवळ 'कोविन ॲप' मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे, असे पालिकेने कळविले आहे.

ती ५ लसीकरण केंद्र -

१. बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).

२. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)

३. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).

४. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).

५. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.