ETV Bharat / briefs

कोल्हापूर : महालक्ष्मी एक्सप्रेस १३ दिवस रद्द; कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा बंद

author img

By

Published : Apr 27, 2021, 9:56 AM IST

गेल्या महिनाभरापासून कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून तिरुपती एक्स्प्रेस, कोयना, महाराष्ट्र, महालक्ष्मी आणि दीक्षाभूमी (धनबाद) एक्स्प्रेस धावत आहेत.

Kolhapur railway station
कोल्हापूर रेल्वे स्थानक

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमुळे प्रवासी कमी असल्याने कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस मंगळवारपासून पुढील १३ दिवस रद्द करण्यात आली आहे. तर अहमदाबाद विमानतळावर काम सुरू असल्याने कोल्हापूर-अहमदाबाद मार्गावरील विमानसेवा शुक्रवार (दि. ३०) पर्यंत स्थगित झाली आहे. तिरुपती मार्गावर प्रवासी असतील तरच कोल्हापूर विमानतळावरून टेकऑफ होणार आहे.

गेल्या महिनाभरापासून कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून तिरुपती एक्स्प्रेस, कोयना, महाराष्ट्र, महालक्ष्मी आणि दीक्षाभूमी (धनबाद) एक्स्प्रेस धावत आहेत. मात्र, प्रवासी संख्या कमी झाली असल्याने मध्य रेल्वेने कोल्हापूर-मुंबई मार्गावर मुंबईहून मंगळवारी सकाळी ही रेल्वे आली आहे. मात्र, कोल्हापूरहून ती मुंबईला जाणार नाही. उर्वरित मार्गावरील रेल्वे सुरू राहणार असल्याचे स्थानक प्रबंधक ए. आय. फर्नांडीस यांनी सोमवारी सांगितले.

कोरोनाचा कोल्हापूरच्या विमानसेवेला देखील फटका बसला आहे. प्रवासी संख्या ५० टक्क्यांवर आली आहे. कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. अहमदाबाद विमानतळावर कामसुरू असल्याने सेवा स्थगित करण्यात आली असल्याचे ही सेवा पुरविणाऱ्या कंपनीने कळविले आहे. अन्य मार्गावरील विमानसेवा सुरू असल्याची माहिती विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांनी सांगितले. तर पुरेसे प्रवासी असतील तरच कोल्हापूर-तिरुपती सेवा पुरवणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.