ETV Bharat / briefs

यवतमाळ : दारव्हामध्ये 11 कोरोनाबाधितांची नोंद; अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 43

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी रात्री दारव्यातील 11 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 43 झाली असून आतापर्यंत एकूण 195 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. तर, आतापर्यंत 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

author img

By

Published : Jun 16, 2020, 3:19 PM IST

दारव्हामध्ये आणखी 11 जण पॉझेटिव्ह
दारव्हामध्ये आणखी 11 जण पॉझेटिव्ह

यवतमाळ - गत दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यातील नेर आणि दारव्हा येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लागोपाठ वाढ होत आहे. काल(सोमवार) रात्री दारव्हातील 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून हे सर्व जण सुरुवातीच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या अगदी निकटच्या संपर्कातील (हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील) आहेत. त्यामुळे, आता जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 43 झाली असून आतापर्यंत एकूण 195 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. तर, जिल्ह्यात आतापर्यंत 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी चार रुग्ण अगदी शेवटच्या क्षणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. तसेच दोन जण वैद्यकीय महाविद्यालयात आणत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी खाजगी रुग्णालयात कोणताही वेळ न घालवता कोव्हीड रुग्णालयात भरती व्हावे. जेणेकरून त्यांच्यावर वेळेवर उपचार करता येतील. वै'द्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णांचा जीव वाचवित आहेत. यात आतापर्यंत तीन रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून काढून डॉक्टरांनी बरे केले आहे. त्यामुळे लक्षणे असलेल्या नागरिकांनी वेळेत भरती होऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांना उपचाराची संधी द्यावी. तसेच कोरोना ही एक संधी मानून नागरिकांनीसुध्दा यापुढे आपली जीवनशैली बदलविणे गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असेल तर आपल्या घरीच नियमित 30 मिनिटे व्यायाम, योगा करा, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा व मृत्यूची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी बाजार किंवा इतरांच्या संपर्कात येणे टाळावे. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीकरता बाजारात गेल्यास सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे. तसेच मास्कचा वापर करावा, साबणाने स्वच्छ हात धुवावे व नियमित सॅनिटायझरचा वापर करावा. ज्या नागरिकांना श्वसनाचा त्रास, 100 अंशापेक्षा जास्त ताप, नियमित खोकला असेल त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नजीकच्या कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर, कोव्हीड रुग्णालयामध्ये तत्काळ दाखल व्हावे. तसेच याबाबत खाजगी रुग्णालयात वेळ न घालवता ग्रामस्तरावरील किंवा तालुकास्तरावरील शासकीय यंत्रणेसोबत संपर्क करून शासकीय रुग्णालयात भरती व्हावे. वरील लक्षणे असल्यास कोणत्याही नागरिकाने स्वत:च्या मर्जीने औषधोपचार करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.