ETV Bharat / briefs

भारत, चीन शांततेच्या मार्गाने सीमावाद सोडवतील, नेपाळने व्यक्त केला विश्वास

भारत आणि चीन शांततापूर्ण मार्गाने दोघांमधील वाद सोडवतील, असे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, नेपाळबरोबरही भारताचा सीमावाद नुकताच सुरु झाला आहे. पाकिस्तान, चीन आणि नेपाळ या तिन्ही शेजाऱ्यांशी भारताचे सीमा वाद सुरु आहेत.

नेपाळ
नेपाळ
author img

By

Published : Jun 20, 2020, 10:29 PM IST

काठमांडू : भारत- चीन दोघांमधील सीमा वाद चर्चेने आणि शांततापूर्ण मार्गाने सोडवतील असा विश्वास नेपाळने व्यक्त केला आहे. जागतिक आणि प्रादेशिक स्थिरता लक्षात घेवून आमचे दोन्ही मित्र देश हा वाद सोडवतील असे नेपाळने म्हटले आहे. भारताचा नेपाळबरोबरही नुकताच सीमावाद सुरु झाला आहे. दरम्यान चीन भारत सीमा वादावर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

बलाढ्य चीन आणि भारतामध्ये नेपाळ दबला गेलेला आहे. नुकतेच लिपूलेक, लिंपियाधुरा आणि कालापाणी हे भारताचे भाग नेपाळने आपल्या नकाशात दाखवण्याबाबत घटनादुरुस्ती केली आहे. त्यामुळे भारतासाठी दुसरी डोकेदुखी सुरु झाली आहे. पाकिस्तान, चीन आणि नेपाळ या तिन्ही शेजाऱ्यांशी भारताचे सीमा वाद सुरु आहेत.

प्रादेशिक आणि जागतिक सुरेक्षसाठी नेपाळ कायम उभा राहिला आहे. आम्हाला विश्वास आहे की, भारत आणि चीन शांततापुर्ण मार्गाने दोघांमधील वाद सोडवतील, असे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

गलवान व्हॅलीमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये 20 भारतीय सैनिक शहिद झाले. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. नेपाळबरोबरही भारताचा सीमावाद सुरु झाला आहे. भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले तीन भूप्रदेश नेपाळने आपल्या नकाशात दाखविले आहेत. कृत्रिमरित्या सीमा वाढविणे भारत कधीही मान्य करणार नाही, असे उत्तर भारताने नेपाळला दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.