ETV Bharat / briefs

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडेंची दौंड क्वारंटाइन सेंटरला भेट - Vaishali nagvade pune news

दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ आणि दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांच्याशी त्यांनी येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली.

Vaishali nagvade
वैशाली नागवडे दौंड़
author img

By

Published : May 8, 2021, 6:01 PM IST

दौंड (पुणे) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दौंडमधील तीन कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी तांत्रिक अडचणींबाबत प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला आणि यातू मार्ग काढण्याची विनंती केली.

तीन कोविड सेंटरला भेट -

सध्या सर्वत्र कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. अनेक रुग्ण हे कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. दौंड तालुक्यातील वाहेगुरू कोविड क्वारंटाइन सेंटर सिंधी धर्मशाळा, गुजराती भवन कोविड सेंटर व शिव जनसेवा कोविड सेंटर या तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे भेट देऊन पाहणी केली.

तांत्रिक अडचणीबाबत चर्चा -

दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ आणि दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांच्याशी त्यांनी येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून या तांत्रिक अडचणींबाबत दौंड-पुरंदरचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, सिविल सर्जन नांदापूरकर यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून मार्ग काढण्याची विनंती केली असल्याची माहिती वैशाली नागवडे यांनी दिली.

नानगाव कोविड सेंटरला वाफेच्या मशिन्स भेट -

वैशाली नागवडे यांनी दौंड नानगाव ग्रामपंचायत व नानगाव प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. तसेच कोरोना रुग्णांना वाफ घेण्यासाठी वाफे मशीन्स या कोविड सेंटरला भेट दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.