ETV Bharat / briefs

मुंबई पोलिसांवर भरवसा नाही, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी तनुश्रीचे पहिलेच सार्वजनिक वक्तव्य - मुंबई पोलीस न्यूज

व्हिडिओ द्वारे स्वतःच्या फॅन्ससोबत लाईव्ह चॅट करताना तनुश्रीने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणासह बॉलीवूडमधील इतर अनेक मुद्द्यांवर मोकळेपणाने चर्चा केली आहे. यामध्ये तिने मुंबई पोलिसांवर भरवसा नाही, असे म्हटले आहे.

तनुश्री दत्ता न्यूज
तनुश्री दत्ता न्यूज
author img

By

Published : Aug 2, 2020, 5:15 PM IST

मुंबई - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. सध्या मुंबई पोलिसांसोबतच बिहार पोलीसही मुंबईहून प्रकरणाची चौकशी करत आहेत. यामध्ये अनेक सेलिब्रिटींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यादरम्यानच, अभिनेत्री तनुश्री दत्ताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तिने मुंबई पोलिसांवर भरवसा नाही, असे म्हटले आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर सार्वजनिकरीत्या तनुश्रीने प्रथमच वक्तव्य केले आहे.

व्हिडिओ द्वारे स्वतःच्या फॅन्ससोबत लाईव्ह चॅट करताना तनुश्रीने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणासह बॉलीवूडमधील इतर अनेक मुद्द्यांवर मोकळेपणाने चर्चा केली आहे.

'निष्पक्षपाती चौकशीच्या बाबतीत मुंबई पोलिसांवर अजिबात भरोसा करता येणार नाही. त्यांना अशा प्रकारच्या केसेस लवकर लवकर संपवायच्या असतात. अनेकदा त्या आरोपीला पोलीस ओळखतही असतात आणि नेत्यांशी आधीपासूनच मिळालेले असतात. प्रकरण तापलेले असते, तेव्हा ते लोकांना जबाब देण्यासाठी बोलावतात. त्यांना लोकांकडून समर्थन मिळावे, यासाठी ते असे करतात,' असे आरोप तनुश्रीने केले आहेत.

‘पोलीस सध्या सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला खेचून आणत आहेत. ते निरपराध लोकांना बोलावून आठ-नऊ तास त्यांचे स्टेटमेंट घेतात आणि संपूर्ण जगाला ते पूर्ण चौकशी करत असल्याचे भासवतात. पोलीस बॉलीवूडपेक्षाही घाणेरडे आहेत. ते केवळ निरपराध लोकांना त्रास देतात. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या प्रेयसीला त्यांच्या मित्रांना पोलीस ठाण्यात बोलावले जाईल. तासन् तास बसवून ठेवेल. मात्र, मुळीच न्याय मिळणार नाही. न्याय हवा असेल तर, पोलिसांकडे पाहू नका. पोलीस कायदा हे सर्व खोटारडे आहेत, जे लोकांना मूर्ख बनवण्यासाठी बसले आहेत आणि ते आपण काहीतरी काम करत आहोत, हे दाखवत असतात,’ असे तनुश्रीने पुढे म्हटले.

हे प्रकरण सीबीआयच्या हातात सोपवले पाहिजे आणि यामध्ये जर अंडरवर्ल्डचा काही संबंध असेल तर, ते इंटरपोलकडे सोपवले पाहिजे. बहुतेक वेळा अशा प्रकरणांमध्ये गुन्ह्यामागे लोकांचा एक गट जबाबदार असतो. कोणती एखादी विशिष्ट व्यक्ती जबाबदार नसते. हे लोक जनतेच्या भावनांशी खेळतात आणि ही केस कधी बंद होईल, त्याचा विचार करत असतात.

याशिवाय, तनुश्रीने स्वतःच्या केसच्या बाबतीतही मत व्यक्त केले. तसेच, ती असेही म्हणाली की, मी या सर्व घाणेरड्या आणि विषारी वातावरणापासून दूर झाले. म्हणूनच मी वाचले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.