मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र आता टप्प्याटप्प्याने राज्य सरकार अनलॉकच्या दिशेने पावले टाकत असून प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या 15 ऑक्टोबरपासून 3 वातानुकूलित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-हरिद्वार, लोकमान्य टिळक टर्मिनस - लखनौ, नागपूर - अमृतसर या गाड्यांचा यात समावेश आहे. या तिन्ही गाडीचे थांबे, वेळ व संरचना नियमित गाडीप्रमाणे राहणार आहे.
गाडी क्रं 02171 लोकमान्य टिळक टर्मिनस-हरिद्वार वातानुकूलित द्वि-साप्ताहिक विशेष गाडी 15 ऑक्टोबरपासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवार व गुरुवारी सुटेल आणि दुसर्या दिवशी हरिद्वारला पोहोचेल. तर गाडी क्रं 02172 वातानुकूलित द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन 16 ऑक्टोबरपासून दर मंगळवार व शुक्रवारी हरिद्वार येथून सुटेल आणि दुसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
गाडी क्रं. 02121 लोकमान्य टिळक टर्मिनस - लखनौ वातानुकूलित साप्ताहिक विशेष ट्रेन 17 ऑक्टोबर पासून दर शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि दुसर्या दिवशी लखनौ येथे पोहोचेल.
तर, गाडी क्रं. 02122 वातानुकूलित साप्ताहिक विशेष ट्रेन 18 ऑक्टोबरपासून दर रविवारी लखनौ येथून सुटेल आणि दुसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.गाडी क्रं. 02025 नागपूर - अमृतसर वातानुकूलित साप्ताहिक विशेष ट्रेन 17 ऑक्टोबरपासून दर शनिवारी नागपूरहून सुटेल आणि दुसर्या दिवशी अमृतसरला पोहोचेल.तर गाडी क्रं 02026 वातानुकूलित साप्ताहिक विशेष ट्रेन 19 ऑक्टोबरपासून दर सोमवारी अमृतसरहून सुटेल आणि दुसर्या दिवशी नागपूरला पोहोचेल.
दरम्यान, या सर्व गाड्यांचे तिकीट बुकिंग 11 ऑक्टोबरपासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर सुरू होईल. अशी माहिती रेल्वेने दिली आहे.तर, केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी असेल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.