ETV Bharat / briefs

जेव्हा नीता अंबानी आयपीएलची ट्रॉफी मंदिरात घेऊन जातात...

या व्हिडिओत मुंबई इंडियन्सने चेन्नईचा पराभव करून जिंकलेली आयपीएलची ट्रॉफी नीता अंबानी यांनी मंदिरात नेल्याचे दिसत आहे. येथे त्या मंत्रोच्चारात पूजा करतानाही दिसत आहेत.

नीता अंबानी
author img

By

Published : May 15, 2019, 8:22 AM IST

Updated : May 15, 2019, 3:15 PM IST

मुंबई - क्रिकेटच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी परस्पर विरोधात उभे ठाकलेले दोन्ही संघ संघर्ष करताना दिसून येतात. एवढेच नाही, तर मैदानाबाहेरही असंख्य चाहते आप-आपल्या संघाच्या विजयासाठी प्रार्थाना करत असतात. आयपीएलच्या अंतिम सामन्यावेळीही क्रिकेट चाहते आपापल्या संघासाठी प्रार्थना करताना दिसून आले. याचदरम्यान नीता अंबानी यांचाही मैदानाबाहेर संघाच्या यशासाठी प्रार्थाना करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

आता नीता अंबानी यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मुंबई इंडियन्सने चेन्नईचा पराभव करून जिंकलेली आयपीएलची ट्रॉफी नीता अंबानी यांनी मंदिरात नेल्याचे दिसत आहे. येथे त्या मंत्रोच्चारात पूजा करतानाही दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे जुहू येथील मंदिर आहे.

अंतिम सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना कायरन पोलार्डच्या ४१ धावांच्या जोरावर चेन्नईसमोर विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात चेन्नईचा शेन वॉटसन वगळता इतर कोणत्याही फलंदाजास छाप टाकता आली नाही. वॉटसनने ५९ चेंडूत ८० धावांची झुंजार खेळी केली. महेंद्र सिंह धोनीची संघाला विजयासाठी एक धाव कमी पडली आणि मुंबईने आयपीएलच्या चषकावर चौथ्यांदा नाव कोरले.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 15, 2019, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.