ETV Bharat / briefs

शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार तांबे यांनी शिक्षणमंत्र्यांशी केली चर्चा

मुंबई मंत्रालय येथे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या दालनामध्ये आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत दत्तात्रय सावंत व श्रीकांत देशपांडे हे होते.

MLA tambe
MLA tambe
author img

By

Published : Jun 25, 2020, 6:38 PM IST

अहमदनगर- माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 13 सप्टेंबर 2019 रोजीच्या अध्यादेशानुसार लवकरात लवकर 20 टक्के व 40 टक्के अनुदान मिळावे. अघोषित शाळांना अनुदान मंजूर करावे, यासह विविध मागण्यांसाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले.

मुंबई मंत्रालय येथे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या दालनामध्ये आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत दत्तात्रय सावंत व श्रीकांत देशपांडे हे होते. यावेळी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, कायम विनाअनुदानित शाळांचा अनुदानाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. तसेच 13 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयामधील सर्व प्रथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची 20 % व 40 % अनुदानाची फाईल लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊन त्वरित अनुदान मंजूर करून वेतन सुरू करावे. तसेच, पुढील अनुदानाचा टप्पा हा प्रचलित नियमानुसार असावा. जेणेकरून शिक्षकांना पुढील टप्प्यासाठी वेठीस धरले जाणार नाही.

तसेच, अघोषित शाळांना घोषित करून अनुदान मंजूर करावे, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा आकृतीबंध मंजूर करावा, शिक्षक भरती पुन्हा सुरू करण्याबाबतही मागणी त्यांनी यावेळी केली. आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवरही शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या समवेत सकारात्मक चर्चा झाली.

या पाठपुराव्या बद्दल अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या 5 जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी आमदार डॉक्टर तांबे यांचे अभिनंदन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.