ETV Bharat / briefs

कर्तारपूर सोहळ्याला मनमोहन सिंग 'कॉमन मॅन' म्हणून हजेरी लावणार; पाकची माहिती - मनमोहन सिंग कर्तारपूर

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी दिली आहे.

परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी
author img

By

Published : Oct 20, 2019, 10:52 AM IST

Updated : Oct 20, 2019, 3:06 PM IST

इस्लामाबाद - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी दिली आहे. मात्र, या उद्घाटन सोहळ्याला ते विशेष अतिथी म्हणून नाही, तर सर्वसामान्य नागरिकाच्या भूमिकेत उपस्थित असणार आहेत, असे ते म्हणाले. 9 नोव्हेंबरला पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन करणार असल्याने मनमोहन सिंग यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

'माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्धाटन सोहळ्याला येण्यासाठी निमंत्रण दिल्याचे मेहमूद कुरेशी यांनी सांगितले. त्यानंतर सिंग यांनी उद्धाटन सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून नाही, तर सर्वसामान्य व्यक्ती म्हणून येणार असल्याचे मान्य केले. याबद्दल कुरेशी यांनी त्यांचे आभार मानले. मनमोहन सिंग सामान्य व्यक्ती म्हणून जरी कार्यक्रमाला येणार असले, तरी आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - 'पाकिस्तान येत्या ९ नोव्हेंबरला कर्तारपूर मार्गिकेचे करणार उद्घाटन'

पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहीब ते भारतातील गुरुदासपूर जिल्ह्यातील बाबा नानक पवित्र स्थळ कर्तारपूर कॉरिडॉरने जोडण्यात येणार आहे. त्यामुळे शीख भाविकांना या दोन्ही पवित्र स्थळांना व्हिसा न बाळगता भेट देता येणार असून, यासाठी फक्त परवानगीची आवश्यता लागणार आहे.

हेही वाचा - गुरु नानक पवित्र स्थळाकडे आता दुर्बीणीतून पाहायची गरज नाही - मोदी

शीखांचे पवित्र धर्मस्थळ गुरुद्वारा दरबार साहीब पाकिस्तानातील नुरवाला जिल्ह्यामध्ये असून, भारत पाकिस्तान सीमेपासून ४ कि.मी. अंतरावरील पाकिस्तानच्या हद्दीत आहे. या ठिकाणी गुरुनानक यांनी १८ वर्षे वास्तव केले असून, त्यांनी अखेरचा श्वासही याच ठिकाणी घेतला. फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेल्याने भारतातील शीख बांधवांना या ठिकाणी जाण्यास अडचणी येत होत्या.

गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्धाटन करण्यात येणार असून, नोव्हेंबरमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. मागील वर्षापासून भारत व पाकिस्तान या मुद्दयांवर चर्चा करत होते.

Intro:Body:

fghfgh

Conclusion:
Last Updated : Oct 20, 2019, 3:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.