मुंबई- नाशिकमध्ये हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. म्हाडाने नाशिकमधील 24 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. 10 ऑगस्टला लॉटरी फुटणार असून या लॉटरीसाठी अर्जविक्री सुरू झाली आहे
30 जुलैपर्यंत अर्जविक्री-स्वीकृती सुरू राहणार आहे. नाशिकमधील कलानगर, म्हसरूळ शिवार येथील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील ही 24 घरे आहेत. यातील 12 घरे अल्प गटातील असून या घरांची किंमत 13 लाख 47 हजार ते 14 लाख 5 हजार अशी आहेत. तर उर्वरित 12 घरे मध्यम गटातील असून त्याची किंमत 20 लाख 23 हजार ते 20 लाख 25 हजार अशी आहेत. अल्प गटातील घर 41.96 चौ.मी क्षेत्रफळाचे असून मध्यम गटातील घर 60.09 ते 60.94 चौ.मीचे आहे.
या घरांसाठी म्हाडाच्या नाशिकमधील मिळकत व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयातून अर्ज विक्री करण्यात येत आहे. तर, अर्जस्वीकृतीही येथेच होणार आहे. अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यास छाननी करत 10 ऑगस्टला लॉटरी काढण्यात येणार आहे.